सर्वच विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मिळणार पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 07:45 PM2018-05-25T19:45:12+5:302018-05-25T19:47:11+5:30

चाळीसगाव : ६४ हजार विद्यार्थ्यांसाठी ३ लाख १७ हजार पुस्तके, १ जूनपासून शाळांना वितरण

All the students will get books on the first day | सर्वच विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मिळणार पुस्तके

सर्वच विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मिळणार पुस्तके

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षण विभागाने मराठी माध्यमाच्या तीन लाख एक हजार ३११ तर उर्दू माध्यमाच्या १६ हजार १९७ अशा एकूण तीन लाख १७ हजार ५७४ पुस्तकांची मागणी नोंदवली आहे.गेल्या आठवड्यात दोन वेळा पुस्तकांच्या गाड्या आल्या. गुरुवारपर्यंत एक लाख ७१ हजार ३७५ पुस्तके प्राप्त झाले आहेत.येत्या दोन ते तीन दिवसात सर्व पुस्तके प्राप्त झाल्यानंतर सर्व शिक्षा अभियानाचे विशेष शिक्षक पंकज रणदिवे, प्रकाश पाटील, रवींद्र पाटील हे शाळांना १ जूनपासून पुस्तके वितरीत करणार आहेत.जि.प.च्या १७८, उर्दू माध्यमाच्या १२ तर खासगी अनुदानित ७३ अशा एकुण २६३ शाळांमधील ६४ हजार २०८ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील. विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जात नाही.इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सेमी इंग्रजी माध्यमात शिकणाºया विद्यार्थ्यांना याच माध्यमातील पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. ही पुस्तकेदेखील उपलब्ध झाली आहेत.

आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि.जळगाव, दि. २५ : येत्या १५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची घंटा वाजणार असल्याने शिक्षण विभागात लगबग सुरू झाली आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांर्तगत मोफत पाठ्यपुस्तके मिळत असल्याने पुस्तके येण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्यातील मराठीआणि उर्दू माध्यमात शिकणाऱ्या ६४ हजार २०८ विद्यार्थ्यांना तीन लाख १७ हजार ५०८ पुस्तकांचे वितरण शाळेच्या पहिल्याच दिवशी केले जाणार आहे.
दर वर्षाप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वषार्ची सुरुवातही विद्यार्थ्यांना नवीकोरी शालेय पाठ्यपुस्तके देऊन होणार आहे. येथील नालंदा विद्यालयात पाठ्यपुस्तके येण्यास सुरुवात झाली असून, मागणी केलेल्या तीन लाख १७ हजार ५७४ पुस्तकांपैकी गुरुवारअखेर दोन लाख ५६ हजार ६३० पुस्तके दाखल झाली आहेत. १ जूनपासून शाळांना पुस्तकांचे संच वितरीत केले जाणार आहे.
शाळेचा पहिला दिवस नेहमीच विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतो. यामुळेच तो संस्मरणीय आणि यादगार करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. कुठे ढोल-ताशांच्या गजरात तर कुठे घोड्यावर बसवून विद्यार्थ्यांना शाळेत आणले जाते. फुले देऊन स्वागत करताना मिष्टान्न देऊनही विद्यार्थ्यांचे तोंड गोड केले जाते. तालुक्यात मराठी व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके दिली जाणार आहेत.
शाळा प्रवेशोत्सव साजरा केला जाणार असून, विद्यार्थ्यांचे स्वागतही होईल.पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे संच दिले जातील. सर्व शाळांना नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - सचिन परदेशी, गटशिक्षणाधिकारी, चाळीसगाव


 

Web Title: All the students will get books on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.