एकनाथराव खडसे यांच्या कुजबुजीने भाजपात खळबळ माजेल, अजित पवार यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 10:14 PM2017-12-28T22:14:09+5:302017-12-28T22:29:40+5:30

एकनाथराव खडसे हे माझ्या कानात काय बोलले हे मी सांगणार नाही, पण त्यामुळे भाजपा नेत्यांची नक्कीच झोप उडेल, राज्यात खळबळ माजेल, असा दावा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  येथे केला.  

Ajit Pawar's claim that the scandal broke out in the BJP | एकनाथराव खडसे यांच्या कुजबुजीने भाजपात खळबळ माजेल, अजित पवार यांचा दावा

एकनाथराव खडसे यांच्या कुजबुजीने भाजपात खळबळ माजेल, अजित पवार यांचा दावा

Next
ठळक मुद्देजायचे असते तरी कधीच पक्षाला लाथ मारली असती - एकनाथराव खडसेअडचणीत आणायचे असेल तर चौकशी

जळगाव:  एकनाथराव खडसे हे माझ्या कानात काय बोलले हे मी सांगणार नाही, पण त्यामुळे भाजपा नेत्यांची नक्कीच झोप उडेल, राज्यात खळबळ माजेल, असा दावा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  येथे केला.  त्यानंतर मात्र पवार यांनी हे मी विनोदाने बोलत असल्याचे म्हणत कानात खडसे काय कुजबुजले याचा खुलासा केला नाही. तर मनोगतात  खडेस यांनी  गेल्या 40 वर्षात मला अनेक प्रलोभने मिळाली पण पक्ष सोडला नाही. पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. जायचे असते तरी कधीच पक्षाला लाथ मारली असती, असेही ते म्हणाले.  
 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय गौरव सोहळा येथील नूतन मराठा महाविद्यालयात गुरुवार, 28 रोजी सायंकाळी पार पडला.   यावेळी व्यासपीठावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि  भाजपाचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे हे एकत्र आल्याने या समारंभाकडे सा-यांचे लक्ष लागले  होते. 
हाच धागा पकडत अजित पवार म्हणाले की,  खडसे यांनी 30 ते 40 वर्षे त्यांच्या पक्षासाठी मेहनतीची तपश्चर्या केली. असे असताना ज्यांच्यासाठी आपण लढलो तेथेच  समस्या निर्माण होते अशी स्थितीही आली. एकीकडे सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची तातडीने चौकशी मार्गी लावली जाते आणि लगेच त्याच पदावर त्यांना संधी दिली जाते. आणि खडसेंच्या बाबतीत मात्र तारीख पे तारीख..अडचणीत आणायचे असेल तर चौकशी..कामाला काय फळ मिळाले, असाही त्यांनी खडसे यांच्या संदर्भात उल्लेख केला. 

Web Title: Ajit Pawar's claim that the scandal broke out in the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.