शेतीच्या वादातून एकाला जळगाव न्यायालय आवारात मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 05:40 PM2018-04-25T17:40:32+5:302018-04-25T17:40:32+5:30

शेतजमिनीच्या वादातून निजामोद्दीन समशेद्दीन पिंजारी (वय ६२, रा.आदर्श नगर, जळगाव) यांना न्यायालयाच्या आवारात पाच जणांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी  मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा घडली. याप्रकरणी बुधवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aggravated by farming, one has beaten up the Jalgaon court premises | शेतीच्या वादातून एकाला जळगाव न्यायालय आवारात मारहाण 

शेतीच्या वादातून एकाला जळगाव न्यायालय आवारात मारहाण 

Next
ठळक मुद्दे पाच जणांविरुध्द गुन्हा दाखलएक दिवस उशिराने दिली तक्रारशेती हडप करण्याचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२५ : शेतजमिनीच्या वादातून निजामोद्दीन समशेद्दीन पिंजारी (वय ६२, रा.आदर्श नगर, जळगाव) यांना न्यायालयाच्या आवारात पाच जणांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी  मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा घडली. याप्रकरणी बुधवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निजामोद्दीन पिंजारी शेत जमिनीच्या कामासाठी मंगळवारी न्यायालयात आले होते. न्यायालयाच्या चौकशी विभागासमोर थांबलेले असताना अब्दुल कादर अब्दुल सत्तार कच्छी, अलाउद्दीन गयासउद्दीन शेख, निरोद्दीन गयासउद्दीन शेख, अशपाकखान हुसेनखान आणि परवेज मुनाफ शेख (रा. सर्व मास्टर कॉलनी, जळगाव) यांनी शिवीगाळ करत पिंजारी यांची कॉलर पकडली. नंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शेती हडपण्याच्या इराद्याने या संशयितांनी आपल्यावर खोट्या केसेस केल्या असे पिंजारी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Aggravated by farming, one has beaten up the Jalgaon court premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.