शंभर वर्षे प्रवासी सेवा बजावून शकुंतलेची ‘भुसावळ’ रेल्वे मुख्यालयात... विश्रांती...!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 06:41 AM2018-10-16T06:41:02+5:302018-10-16T06:42:50+5:30

आशियात विशेष करुन भारतात १८५३ मध्ये पहिली रेल्वे धावली... त्याची आठवण आज दीडशे वर्षानंतरही अनेक वर्षे ताजी आहे... नव्हे ती भारतीय रेल्वे मंडळाने जपली आहे.

after hundred years shakuntala express stop her service | शंभर वर्षे प्रवासी सेवा बजावून शकुंतलेची ‘भुसावळ’ रेल्वे मुख्यालयात... विश्रांती...!

शंभर वर्षे प्रवासी सेवा बजावून शकुंतलेची ‘भुसावळ’ रेल्वे मुख्यालयात... विश्रांती...!

Next

- पंढरीनाथ गवळी

जळगाव : आशियात विशेष करुन भारतात १८५३ मध्ये पहिली रेल्वे धावली... त्याची आठवण आज दीडशे वर्षानंतरही अनेक वर्षे ताजी आहे... नव्हे ती भारतीय रेल्वे मंडळाने जपली आहे. देशात भारतीय रेल्वेच्या सुरुवातीपासून ते आज पर्यंतच्या प्रगतीच्या अनेक खाणाखुणा आहेत. ज्यावेळी रेल्वेत बसायलाही लोक घाबरत होते. त्या ब्रिटिश काळातील वाफेवरील काही रेल्वे इंजिन आज भुसावळ रेल्वेची शोभा वाढवत आहेत... त्यातीलच ‘शंकुतला’ नावाचे रेल्वे इंजिन भुसावळ रेल्वे विभागासाठी एक गौरवशाली आणि रेल्वेच्या इतिहासात नोंद म्हणून त्याचा उल्लेख करावा लागेल असे आहे...


‘शकुंतला’ हे वाफेवरील रेल्वे इंजिन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचा सर्व कारभार पाहणाऱ्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) व पूर्वीच्या डीएस आॅफीसच्या दर्शनी भागात मोठ्या दिमाखात आणि रेल्वेची दीडशे वर्षांची परंपरा जपत एका खास अशा चबुतºयावर डौलात उभे आहे.
डीआरएम कार्यालयात येणाºया प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि बाहेरील लोकांसाठी ‘शकुंतला’ एक आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

शकुंतलाच्या निर्मितीचा इतिहास
या इंजिनाला (स्टीम लोकामोटीव्ह) म्हणजे वाफेवरील रेल्वे इंजिन संबोधले जाते. ते एन.जी. म्हणजे नॅरोगेज श्रेणीतील आहे. या इंजिनाची बांधणी युएसए (अमेरिका) तील ब्लाडवीन लोकोमोटीव्ह वर्कशॉप फिल्डेलफिया या ठिकाणी १९१६ मध्ये करण्यात आली आहे.हे इंजिन भारतीय रेल्वेच्या महाराष्ट्रातील ‘अचलपूर-मूर्तीजापूर-यवतमाळ’ सेक्शनमध्ये धावले. ते १९१७ मध्ये रेल्वे रुळावर आले.


बांधणीसाठीचा ७६ हजार खर्च
‘शकुंतला’ या नॅरोगेज लाईनवर चालणाºया इंजिनला त्याकाळी म्हणजे १९१६ साली ७६ हजार ३३४ रुपये खर्च आला. त्याची धावण्याची क्षमता ताशी ३० कि.मी. इतकी आहे. त्यावरील पाण्याच्या टाकीची क्षमता १३०० गॅलनची आहे.त्याची कोळसा साठवण्याची क्षमता ३ हजार ७५० मे.टन इतकी आहे.या इंजिनात दोन सिलिंडर आहेत. त्यांची साईज १२ बाय ८ इतकी आहे. चाके २-८-२ अशी आहेत. ट्रॅक गेज दोन फूट सहा इंच आहे. चाकांचे डायमीटर दोन फूट दहा इंच आहे.या इंजिनाचे वजन ४४.४ मे.टन इतके आहे. त्याची एकूण लांबी ४२ फूट ११ इंच इतकी आहे.
दरम्यान, बरेच वर्षे हे इंजिन डीआरएम कार्यालयाच्या आवारात एका बाजुला उभे करुन ठेवण्यात आले होते.त्यानंतर रेल्वे प्रशासनाने अशी इंजिन जतन करण्यासाठी खास उपाय योजना केल्या. त्यामुळे अडगळीतील आणि वैभवशाली इतिहास असलेल्या इंजिनाचे भाग्य उजळले. आधुनिक पद्धतीने रंगरंगोटी आणि दुरुस्ती करुन ‘शकंतुला’ मोठ्या दिमाखात आपले रुप न्याहाळत उभे आहे.या इंजिनामुळे डीआरएम कार्यालयाचाही ‘लूक’ बदलला आहे.

‘शकुंतला एक्स्प्रेस नावाने ओळख...
विशेष करुन हे इंजिन अचलपूृर-अमरावती-यवतमाळ या मार्गावर पॅसेंजर गाडी घेऊन धावत असे. त्यावेळी या इंजिनाला शकुंतला रेल्वेज असे नाव पडले आणि या मार्गावर धावणारी ही गाडी ‘शकंतुला एक्स्प्रेस’ या नावाने ओळखली जाऊ लागली.


‘शकुंतला’ची प्रतिष्ठापणा...
१५ जानेवारी २०१५ मध्ये मध्य रेल्वेचे तत्कालीन सरव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांच्या हस्ते आणि तत्कालीन डीआरएम महेश कुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत डीआरएम कार्यालयासमोर प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.

 

 

Web Title: after hundred years shakuntala express stop her service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.