जळगावात मनपाची प्लॅस्टिक विरोधात मोहिम : १९ जणांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 12:41 PM2018-06-26T12:41:56+5:302018-06-26T12:42:59+5:30

फुलमार्केट, गोलाणी मार्केट परिसरात कारवाई

Action against Municipal Plastics in Jalgaon: 19 people have to take action against them | जळगावात मनपाची प्लॅस्टिक विरोधात मोहिम : १९ जणांवर कारवाईचा बडगा

जळगावात मनपाची प्लॅस्टिक विरोधात मोहिम : १९ जणांवर कारवाईचा बडगा

Next
ठळक मुद्देदुकानातून प्लॅस्टिक जप्तीच्या वेळेस गोंधळ आणि धावपळदंडात्मक कारवाई

जळगाव : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी दिवसभर फुले मार्केट व गोलाणी मार्केट परिसरात धडक मोहिम राबवत प्लॅस्टिक वापर आणि विक्री करणाऱ्या १९ दुकानधारकांवर दंडात्मक कारवाई केली़ कारवाईच्या पहिल्याच दिवशी या १९ जणांकडून ९५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला़ दरम्यान आरोग्य विभागातर्फे प्लॅस्टिक विक्री व वापर न करण्याबाबत बाबत दुकानधारक व नागरिकांना सूचना देखील केल्या. मंगळवारपासून ही कारवाई अधिक कडक करण्यात येईल, असे आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी सांगितले़
महाराष्ट्र शासनाने विघटनशील व अविघटनशील कचरा नियंत्रण कायद्यानुसार जळगाव महापालिका कार्यक्षेत्रात २३ जूनपासून प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे़ त्यानुसार सोमवारपासून आरोग्य विभागातर्फे धडक मोहिम राबविण्यात आली़ त्याच्या नियोजनासाठी सकाळी १० वाजता मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या दालनात बैठक पार पडली़ यावेळी आरोग्य अधिकारी, आरोग्य अधीक्षक तसेच अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़
डांगे यांनी कारवाई करण्याच्या सुचना केल्या़ आज समज देण्यात यावी, परंतू, अधिक प्रमाणात प्लॅस्टिक आढळ्यास कारवाई करावी अशा सुचना त्यांनी केल्या़ त्यानंतर पाच हजार रूपये दंड आकारावे, पुन्हा आढळ्यास दहा त्यानंतर पंचवीस हजार तर चौथ्या वेळेस विक्री व वापर करताना आढळुन आल्यास संबंधिताविरूध्द न्यायालयात केस दाखल करण्याच्या सुचना केल्या़ अन् कारवाई करण्याचे निर्देश दिले़ त्यानुसार तीस-तीस कर्मचाºयांचे दोन पथक तयार करण्यात आले़
दुकानातून प्लॅस्टिक जप्तीच्या वेळेस गोंधळ आणि धावपळ
आरोग्य अधिकारी उदय पाटील, आरोग्य अधीक्षक ए़ऩनेमाडे, अतिक्रमण अधिकारी एच़एमख़ान, हरिष सोनवणे, ज्ञानेश्वर कोळी, रमेश कांबळे यांच्या पथकाने सकाळी ११ वाजता फुले मार्केटमध्ये धडक दिली़ पथकाकडून फुलेमार्केटमधील दुकानांची पाहणी करण्यात येऊन दुकानधारकांना प्लॅस्टिक न वापरण्याबाबत सुचना करण्यात आल्या़ मार्केटमध्ये पथक कारवाईसाठी आले असल्यामुळे सर्वत्र गोंधळ व धावपळ उडाली़
मनोज मतानी ट्रेडर्स या दुकानात पथकाने धडक देऊन पाहणी केली असता सर्वाधिक प्लॅस्टिक या दुकानातून जप्त करण्यात आला़ बेसमेंटमध्ये ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या वाट्या, पत्रावळी तसेच पिशव्या जप्त करण्यात आल्या़ अन् दुकानमालकावर जागेवर पाच हजार रूपयांची दंडाची कारवाई करण्यात आली़ त्यानंतर सरस्वती ट्रेडींग कंपनी व एसक़े़प्लॅस्टिक या दुकानांची झडती घेऊन प्लॅस्टिक जप्त केले़ त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली़

Web Title: Action against Municipal Plastics in Jalgaon: 19 people have to take action against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.