चाळीसगावला जुगार खेळणा-या १५ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 10:12 PM2018-04-19T22:12:50+5:302018-04-19T22:12:50+5:30

पोलिसांनी केली ५८ हजाराची रोकड हस्तगत

Action on 15 people playing the gambling in Chalisgao | चाळीसगावला जुगार खेळणा-या १५ जणांवर कारवाई

चाळीसगावला जुगार खेळणा-या १५ जणांवर कारवाई

Next
ठळक मुद्देचाळीसगाव शहरात तीन ठिकाणी केली कारवाईअक्षय तृतीयेनिमित्त सुरु होता ठिकठिकाणी जुगार५८ हजार रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त

आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, दि. १९ : चाळीसगाव परिसरात अक्षय तृतीयेनिमित्त सार्वजनिक जागी जुगार खेळणा-यांवर बुधवारी दिवसभर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारुन १५ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५८ हजाराची रोकडही हस्तगत केली.
खरजई रोडलगत अमरधाम जवळ चाळीसगाव परिमंडळाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या पथकाने जुगार खेळणा-यावर झडप घातली. संभाजी कोष्टी, एकनाथ सोमवंशी, प्रेमाजी गवळी, योगेश चौधरी, हर्षल पवार, संजय गवळी यांना ताब्यात घेऊन ३९ हजार ११० रुपये, जुगाराचे साहित्य जप्त केले.
पाटणादेवी रोड लगत जुगार खेळणा-यांवर शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांनी कारवाई केली. सुनिल चौधरी, राजू भील, राजू झोडगे, मनोहर गवळी यांना जुगार खेळतांना पकडले. त्यांच्याकडून तीन हजार १५० रुपये जप्त केले. धुळे रोड येथेही लक्ष्मण गवळी, अनिल सपके, सुपाजी दाजीअप्पा गवळी यांना जुगार खेळतांना ताब्यात घेण्यात आले. जुगाराचे साहित्य आणि ११ हजार ५८० रुपये हस्तगत केले गेले.
ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील चांभार्डी येथे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी गोकुळ नागरे, संतोष मारोतीराव वाघ, सुरेश निंबा पाटील, कारभारी रामराव वाघ, कृष्णा संजय पाटील, सुभाष विठ्ठल पाटील यांना जुगार खेळतांना पकडले. त्यांच्याकडून आठ हजार ७१६ रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले.

Web Title: Action on 15 people playing the gambling in Chalisgao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.