भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ अपघात : पिता-पुत्र ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 07:47 PM2018-12-19T19:47:50+5:302018-12-19T19:48:58+5:30

कारने मोटारसायकलला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिल्याने पिता-पुत्रासह दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला. मृतात रवींद्र नारायण जैतकर (वय ४२) व चार वर्षांचा मुलगा चेतन रवींद्र जैतकर (दोन्ही रा.ऐनपूर, ता.रावेर) यांचा समावेश आहे.

Accident near Bohardi village in Bhusawal taluka: Father and son killed, one injured | भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ अपघात : पिता-पुत्र ठार, एक जखमी

भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ अपघात : पिता-पुत्र ठार, एक जखमी

Next
ठळक मुद्देकारने मोटारसायकलला धडक दिल्यानंतर घडली दुर्घटनामृतात चार वर्षांच्या बालकाचा समावेश

वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : कारने मोटारसायकलला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिल्याने पिता-पुत्रासह दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला. मृतात रवींद्र नारायण जैतकर (वय ४२) व चार वर्षांचा मुलगा चेतन रवींद्र जैतकर (दोन्ही रा.ऐनपूर, ता.रावेर) यांचा समावेश आहे. भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ राष्ट्रीय मार्गावर दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
पोलीस सूत्रांनुसार, ऐनपूर, ता.रावेर येथील रवींद्र नारायण जैतकर व त्यांचा चार वर्षांचा मुलगा चेतन तसेच प्रभाकर कोळी (रा.सालबर्डी, ता.मुक्ताईनगर) हे मुक्ताईनगरहूून वरणगावकडे मोटारसायकल (क्रमांक एमएच-१९-बीएफ-३६८७) ने येत होते. तेव्हा मागून येणाऱ्या कार (क्रमांक एमएच-३१-सीएन-९९७७) ने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिली. या अपघातात चार वर्षांचा मुलगा चेतन हा जागीच ठार झाला, तर त्याचे वडील रवींद्र जैतकर व प्रभाकर कोळी हे गभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात नेत असताना रवींद्र जैतकर यांचा वाटेत मृत्यू झाला, तर प्रभाकर कोळी यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत विजय नारायण जैतकर रा.ऐनपूर यांनी फिर्याद दिली. त्यावरून कार चालक रामचंद्र चैतराम सोनवणे याच्याविरोधात मोटार आपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पो.हे.कॉ.मनोहर पाटील करीत आहे.

Web Title: Accident near Bohardi village in Bhusawal taluka: Father and son killed, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.