पुण्यात पेट्रोल पंपावर दरोड्यातील प्रयत्नातील फरार आरोपीला जळगावात पिस्तुलसह पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 03:54 PM2019-06-26T15:54:56+5:302019-06-26T15:57:04+5:30

पुण्यातील हिंजवडी परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या तावडीतून निसटलेल्या रामेश्वर शेषमल राठोड (२५, रा.आयटीआय कॉलनी, जामनेर) याला एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सकाळी एमआयडीसीतील व्ही.सेक्टरमधील टायटन कंपनीजवळ एक गावठी पिस्तुल व पाच जीवंत काडतुसासह पकडले. राठोड याच्याविरुध्द आर्मअ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 The absconding absconding accused in a petrol pump in Pune caught the accused with a pistol in Jalgaon | पुण्यात पेट्रोल पंपावर दरोड्यातील प्रयत्नातील फरार आरोपीला जळगावात पिस्तुलसह पकडले

पुण्यात पेट्रोल पंपावर दरोड्यातील प्रयत्नातील फरार आरोपीला जळगावात पिस्तुलसह पकडले

Next
ठळक मुद्दे एमआयडीसी पोलिसांची कारवाई  पाच जीवंत काडतूसही जप्त ‘लोकमत’ च्या वृत्तामुळे सापडला आरोपी

जळगाव : पुण्यातील हिंजवडी परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या तावडीतून निसटलेल्या रामेश्वर शेषमल राठोड (२५, रा.आयटीआय कॉलनी, जामनेर) याला एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सकाळी एमआयडीसीतील व्ही.सेक्टरमधील टायटन कंपनीजवळ एक गावठी पिस्तुल व पाच जीवंत काडतुसासह पकडले. राठोड याच्याविरुध्द आर्मअ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील हिंजवडी भागातील आयटी नगरीतील मारुजी रस्त्यावर २४ रोजी रात्री एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना हिंजवडी पोलिसांनी शुभम मनिलाल जैन (२१, रा.गिरीजा कॉलनी, जामनेर), प्रकाश किशोर मोरे (२७, रा.गणेशवाडी, जामनेर), विशाल अरुण वाघ (२२, रा.महुखेडा, ता.जामनेर) व प्रतीक शिवाजी बारी (२०, रा.आयटीआय कॉलनी, जामनेर) या चौघांना शस्त्रासह पकडले होते तर प्रशांत पाटील व रामेश्वर राठोड हे दोन्ही जण दुचाकीवरुन पसार झाले होते.या चौघांच्या चारचाकीत लोखंडी कट्यार, गुप्ती, चाकू, कोयता, कात्री व बंदुकीसारखे दिसणारे लायटर असे जप्त करण्यात आले होते. चार जण चारचाकी तर राठोड व प्रशांत हे दुचाकीवर होते. पोलीस आल्याचे समजताच दुचाकीवरील दोघांनी चारचाकीमधील चौघांना इशारा केला होता, त्यामुळे चौघांना पलायन केले होते. पोलिसांनी नेर गावाजवळ पाठलाग करुन चारचाकी अडविली होती.
राठोडचीही दरोड्याचीच तयारी
एमआयडीसीत व्ही.सेक्टरमध्ये एक जण गावठी पिस्तुलसह असल्याची माहिती कॉ.विजय पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक राजकुमार ससाणे, सहायक फौजदार अतुल वंजारी, विजय पाटील, मनोज सुरवाडे, प्रवीण मांडोळे, अशोक सनगत, असीम तडवी व मुदस्सर काझी यांच्या पथकाने तातडीने व्ही.सेक्टर गाठले. राठोड या टायटन कंपनीजवळ आढळून आला. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्तुल व पाच जीवंत काडतूस आढळून आले. प्रवीण मांडोळे यांच्या फिर्यादीवरुन राठोड याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी हिंजवडी पोलिसांशी संपर्क करुन आरोपीची माहिती कळविली आहे. त्यामुळे तेथील पोलीस लवकरच त्याचा ताबा घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘लोकमत’ वृत्तामुळे सापडला आरोपी
हिजंवडीच्या गुन्ह्यात रामेश्वर फरार ‘लोकमत’ मध्ये मंगळवारी वृत्त प्रकाशित झाले होते. हे वृत्त कॉ.विजय पाटील यांनी वाचले होते. नेमके बुधवारी राठोडची माहिती कॉ.पाटील यांना मिळाली, आणि पथकाने त्याला अटक केली.

Web Title:  The absconding absconding accused in a petrol pump in Pune caught the accused with a pistol in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.