४५ लाखाचा अपहार,तीन जणांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:39 AM2019-03-27T11:39:11+5:302019-03-27T11:40:12+5:30

मुख्य संशयित फरार : ‘अटकपूर्व’वर खुलासा

45 lakhs of ammunition, three inquiry cases | ४५ लाखाचा अपहार,तीन जणांची चौकशी

४५ लाखाचा अपहार,तीन जणांची चौकशी

Next


जळगाव : खोट्या सह्या व ठराव करुन शासनाचे ४५ लाख रुपये अनुदान लाटल्याच्या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी निमजाई फांऊडेशनचे भरत अरविंद भंगाळे (४० रा.भवानी पेठ), राजेश नरेंद्र नारखेडे (४९, रा.विनोबा नगर, जळगाव) व भगवान दगडू पाटील (४९, रा.वाल्मिक नगर, जळगाव) या तिघांची चौकशी केली. या तिघांसह मोहीनी भरत भंगाळे (३१) अशा चौघांना औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या या अर्जावर पोलिसांनी मंगळवारी खंडपीठात खुलासा सादर केला.
दरम्यान, यातील मुख्य संशयित भूषण गणेश बक्षे, शीतल भगवान पाटील हे दोघं अद्याप फरारच असून पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. दोन वेळा पोलिसांचे पथक दोघांच्या घरी तसेच गणेश कॉलनी परिसरातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जावून आले, मात्र ते मिळाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, भरत भंगाळेसह चौघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर खंडपीठाने तपाधिकाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपासाधिकारी संदीप पाटील यांनी मंगळवारी खंडपीठात म्हणणे सादर करुन या चौघांचा अटकपूर्व जामीन नियमित करु नये तसेच मुख्य आरोपी फरार असून अपहाराचा आकडा मोठा असल्याचे न्यायालयात सांगितले.
दरम्यान, या चौघांना खंडपीठाने तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर तात्पुरता अटकपूर्व मंजूर केला होता. त्यानुसार संदीप पाटील यांनी मोहिनी भंगाळे व्यतिरिक्त तिघांची सोमवारी चौकशी केली. दरम्यान, या दोन दिवसात आणखी काही जणांची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: 45 lakhs of ammunition, three inquiry cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.