41 candidates ineligible for recruitment in Jalgaon police on second day | जळगाव पोलीस भरतीत दुस-या दिवशी ४१ उमेदवार अपात्र

ठळक मुद्दे १६३ उमेदवार गैरहजर मोजमापबाबत उमेदवारांनी घेतला आक्षेप पोलीस अधीक्षकांनीच मोजली उंची

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, १३ : पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ११२ जागांसाठी पोलीस कवायत मैदानावर भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. दुस-या दिवशी ८०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते, त्यापैकी ६६५ उमेदवार हजर राहिले तर १६३ उमेदवार गैरहजर राहिले. हजर असलेल्यांपैकी ६२४ पैकी शारीरीक चाचणीत पात्र ठरले तर ४१ उमेदवार छाती व उंची मोजमापमध्ये अपात्र ठरले.  बुधवारी ८०० उमेदवारांना बोलावण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यासह अधिकारी वर्ग पहाटे साडे तीन वाजेपासून मैदानावर हजर होते. दरम्यान, उंची व छाती मोजमाप करताना उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी स्वत: या उमेदवारांची मोजमाप केली.
असे आहेत जागांचे आरक्षण
जिल्हा पोलीस दलातर्फे ११२ जागांसाठी ही भरती होत आहे. सर्व जागा खुल्या प्रवर्गातील असून त्यात सर्वसाधारण ३२, महिलांसाठी राखीव ३४, खेळाडू ६, प्रकल्पग्रस्त ६, भूकंपग्रस्त २, माजी सैनिक १७, अंशकालिन पदवीधर ६, पोलीस पाल्य ३ व गृहरक्षक दलासाठी ६ जागा राखीव आहेत.


Web Title: 41 candidates ineligible for recruitment in Jalgaon police on second day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

प्रमोटेड बातम्या

जळगाव अधिक बातम्या

पांढऱ्या सोन्याचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त

पांढऱ्या सोन्याचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त

41 minutes ago

मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे बालिकांचा वाढदिवस साजरा करण्याचा नवीन उपक्रम

मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे बालिकांचा वाढदिवस साजरा करण्याचा नवीन उपक्रम

57 minutes ago

भुसावळ येथे नवीन एलएचबी कोचेसला पीओएच वर्कशॉप निर्मिती व्हावी तत्काळ परवानगी मिळावी

भुसावळ येथे नवीन एलएचबी कोचेसला पीओएच वर्कशॉप निर्मिती व्हावी तत्काळ परवानगी मिळावी

2 hours ago

उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या तिकीट परीक्षकांचा भुसावळ येथे सन्मान

उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या तिकीट परीक्षकांचा भुसावळ येथे सन्मान

2 hours ago

भुसावळ येथे दिव्यांगांचे उपोषण

भुसावळ येथे दिव्यांगांचे उपोषण

2 hours ago

भुसावळ शहरात ख्रिसमसची जोरदार तयारी

भुसावळ शहरात ख्रिसमसची जोरदार तयारी

3 hours ago