3 thousand activists from the district of attackball marchas | हल्लाबोल मोर्चास जळगाव जिल्ह्यातून 3 हजारावर कार्यकर्ते जाणार

ठळक मुद्देजिल्ह्यातून 3 हजारावर कार्यकर्ते जाणारशरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री अजित पवार आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चानागपूर येथे राष्ट्रवादी तर्फे प्रचंड हल्लाबोल मोर्चा

आॅनलाईन लोकमत

जळगाव- सरकार सर्वच पातळीवर अपयशी झाले आहे. शेतकरी आणि सामान्या जनता असे सर्वच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळ हैराण झाले आहेत. जनतेचा हा ‘आक्रोश’ प्रभावीपणे विधानसभेत पोहचविण्यासाठी नागपूर येथे राष्ट्रवादी तर्फे प्रचंड हल्लाबोल मोर्चा 12 रोजी काढला जात आहे. यासाठी जिल्ह्यातून पदाधिका:यांसह 3 हजारावर कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील यांनी दिली.

या मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील माजी आमदार तसेच पदाधिका:यांची बैठक बुधवारी दुपारी राष्ट्रवादी कार्यालयात झाली. यानंतर ही पत्र परिषद झाली. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष गफ्फार मलीक, माजी आमदार दिलीप वाघ व अरुण पाटील, अॅड. रवींद्र पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, महानगर अध्यक्ष निलेश पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ललित बागुल, महानगर जिल्हा अध्यक्षा निला चौधरी, जळगाव तालुका विधानसभाक्षेत्र प्रमुख राजेश पाटील, डॉ. राजेंद्र देसले, बापू चौधरी, निलेश बोदडे, सोमनाथ पाटील आदी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी विविध कारणांनी अडचणीत सापडला आहे. पिकांना भाव नाही. धान्य खरेदी केंद्रही सुरु नाहीत. जी खरेदी होते ती अल्प प्रमाणात केली जाते.

कजर्माफीही फसवी ठरली आहे. सामान्य जनता महागाईत होरपळत आहे. जनतेचे हे सर्व प्रश्न घेवून 1 डिेसेंबर पासून यवतमाळ येथून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आक्रोश दिंडी निघाली आहे. ती नागपूरला 11 रोजी रात्री पोहचणार आहे. पक्षाचे नेते शरद पवार यांचा 12 रोजी वाढदिवस असून शेतक:यांची स्थिती पाहता वाढदिवस साजरा न करता याच दिवशी नागपूर विधानभवनावर मोर्चा नेण्याचे आवाहन पवार यांनी केल्या नुसार जिल्ह्यातून मोठय़ा संख्येने कार्यकर्ते व शेतकरी जाणार आहेत, असेही त्यानी सांगितले. स्वत: शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणर असून शेवटी मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. या सरकारच्या कामांचा समाचार घेतला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. या मोर्चात शेतकरी व जनतेनेही मोठय़ संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही पदाधिका:यांनी केले आहे.