२५० लोककलावंतांची पंढरी : नगरदेवळे नगरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 03:32 PM2019-06-17T15:32:24+5:302019-06-17T15:32:46+5:30

‘देवळांचे नगर’ असा धार्मिक इतिहास असलेले जळगाव जिल्ह्यातीील नगरदेवळे (ता.पाचोरा) हे गाव आपल्याला यादव काळाच्या अगोदर घेऊन जाते़ या गावात दोन तर परिसरात संगमेश्वर दिघी व वाघळी अशी अधिक मंदिरे आहेत़ प्रत्यक्ष गावात ३५० पेक्षा अधिक मंदिरे व दर्गाह आहेत़ धार्मिकदृष्ट्या हे गाव जसे महत्वाचे मानले जाते तशी या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमीसुद्धा आहे़ अशा या नगरदेवळ्यात अडीचशेवर लोकलावंत होऊन गेले. याविषयी लिहिताहेत एस.के.पवार विद्यालयाचे शिक्षक संजीव बावस्कर.

250 people of Pimpri: People of Nagarvele city | २५० लोककलावंतांची पंढरी : नगरदेवळे नगरी

२५० लोककलावंतांची पंढरी : नगरदेवळे नगरी

googlenewsNext

देशाला स्वातंत्र्य मिळाले. संस्थाने खालसा झाली़ नगरदेवळ्याची जहागिरी मुंबई सरकारने १९५३ सरकार जमा केली़ लोककलावंतांचा राजाश्रय संपला़ स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतर जनजागृतीसाठी लोककला पथकाची स्थापना करण्यात आली़ शाहीर रामचंद्र जोशी यांनी गावातील कुलकर्णी अप्पा, जाधवसिंग परदेशी, तुकाराम बोरसे जगन चौधरी, रजेसिंग अण्णा, विठ्ठल ठाकूर लक्ष्मण धोबी, गोसावी बुवा, भागचंद गोंधळी, इ़ लोककलावंतांना सोबत घेऊन १९४२ च्या चळवळीत जनजागृतीचे काम केले़ यांचे लोककला पथक खूप प्रसिद्धीला आले़
कालांतराने एक मुलगा आपल्या खर्ड्या आवाजात स्वरचित रचना सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत होता़ त्याच्या आवाजाची उंची जबरदस्त होती़ काकांनी या मुलाला आपल्या कलापथकात सामिल करून घेतले़ आपल्या बुलंद व स्वरचित कवनाने या तरूणाने लोकांना झपाटून टाकले़ त्यांचे कलापथक त्या काळात चांगलेच नावारूपाला आले़ त्या लोककलावंतांचे नाव होते शाहीर शिवाजीराव पाटील़ त्यांच्या आवाजाची धाटणीच वेगळी़ उपजत प्रतिमा शक्तीमुळे इतरांच्या रचना न गाता स्वरचित रचनांना त्यांनी प्राधान्य दिले़ आज महाराष्ट्रात अनेक शाहीर आहेत़ परंतु स्वरचित रचना सादर करणारे खूप कमी आहेत़ त्यात शाहीर शिवाजीराव पाटलांचे नाव आवर्जुन घ्यावेसे वाटते़
शाहीर शिवाजीरावांनी शाहिरी स्वत: पुरती मर्यादित न ठेवता लोकाभिमुख केली़ त्यांनी वेगवेगळ्या विषयांना हात घातला़ समाजात असलेली निरक्षरता जातीय, विद्वेष, पर्यावरण, ºहास, शेतकरी आत्महत्या, हुंडा पद्धती इ़ अनेक समस्यांवर त्यांची लेखणी सफाईदारपणे फिरली़ पोवाडा, लोकगीत, भारूड, या लोककला प्रकारांच्या खुबीने वापर करत त्यांनी समाजाच्या समस्यांना वाचा फोडली़ त्यांच्या पथकात नामदेव सोन्नी व रामसिंग राजपूत हे स्त्रीपात्र भूमिका संवाद व अभिनयाने प्रेक्षकांची करमणूक अगदी सहजपणे सादर करून ते प्रेक्षकांना आकर्षित करतात़ (क्रमश:)
-संजीव बावस्कर, नगरदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव

Web Title: 250 people of Pimpri: People of Nagarvele city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.