15 mobile usage of thieves in Jalgaon for 20 days | जळगाव येथे सोनसाखळी चोरटय़ांकडून 20 दिवसात 15 मोबाईलचा वापर

ठळक मुद्देसर्वच  मोबाईल चोरीचेयात्रेत अमाप पैशांची उधळपट्टी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 02-   शहर व जिल्ह्यातून 11 ठिकाणी महिलांच्या सोनसाखळी लांबविणा:या चौघं चोरटय़ांनी 20 दिवसात तब्बल 15 मोबाईल वापरले असून हे सर्वच  मोबाईल चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पोलीस कोठडीचा हक्क राखून अटकेतील तिन्ही चोरटय़ांची सोमवारी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 
शेंगोळा (ता.जामनेर) यात्रेत अमाप पैशांची उधळपट्टी करताना रडारवर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करण प्रल्हाद मोहीते (वय 20 मुळ रा.तरवाळे, ता.चाळीसगाव), दीपक रेवाराम बेलदार (वय 19, मुळ रा.खडकी-बोरगाव, ता.बोदवड) व दिनेश गजेंद्र मोहीते (वय 19 मुळ रा. तळेगाव, ता. जामनेर) तिन्ही ह.मु.पिपरीया, ता.वापी, जि.बलसाड, गुजरात यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. 
एक जण फरार
महिलांची सोनसाखळी लाबंविणा:या या तिघांचा साथीदार मच्छिंद्र पवार (रा.सिल्वासा, गुजरात) हा फरार असून त्याच्या शोधासाठी पथक पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी  दिली.