हतनूर धरण परिसरात १२० प्रजातींची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 03:18 PM2018-11-12T15:18:15+5:302018-11-12T15:19:26+5:30

हतनूर परिसरात यंदा १२० विविध प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने वारकरी, वैष्णव, गढवाल, थापट्या, शेंडी बदक, प्लावा बदक, चित्रबलाक, नदीसुरय, खंड्या, चातक यासारख्या १२० प्रजातींची नोंद संस्थेतर्फे करण्यात आली.

The 120 species recorded in the Hatanaur Dam area | हतनूर धरण परिसरात १२० प्रजातींची नोंद

हतनूर धरण परिसरात १२० प्रजातींची नोंद

Next
ठळक मुद्देचातक संस्थेतर्फे पक्षी निरीक्षण व गणनाप्रामुख्याने वारकरी, वैष्णव, गढवाल, थापट्या, शेंडी बदक, प्लावा बदक, चित्रबलाक, नदीसुरय, खंड्या, चातक यासारख्या प्रजातींची नोंदयात युरोप, आशिया, उत्तर भारत, या भागातून स्थलांतर करुन येणाºया पक्ष्यांची संख्या शेकडोंनी

खिर्डी, ता.रावेर, जि.जळगाव : हतनूर परिसरात यंदा १२० विविध प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने वारकरी, वैष्णव, गढवाल, थापट्या, शेंडी बदक, प्लावा बदक, चित्रबलाक, नदीसुरय, खंड्या, चातक यासारख्या १२० प्रजातींची नोंद संस्थेतर्फे करण्यात आली.
१२ नोहेंबर हा दिवस बर्डमॅन आॅफ इंडिया डॉ.सलीम अली यांचा जन्मदिवस म्हणून भारतात सर्वत्र साजरा केला जातो. यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पक्षी निरीक्षण व गणना करण्यात येते. चातक निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे हतनूर धरण व परिसर या क्षेत्रात पक्षी निरीक्षण व पक्षीगणना केली. यात युरोप, आशिया, उत्तर भारत, या भागातून स्थलांतर करुन येणाऱ्या पक्ष्यांची संख्या शेकडोंनी दिसून आली.
चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष व पक्षी अभ्यासक अनिल महाजन, सचिव उदय चौधरी, विलास महाजन, विठ्ठल भरगडे, डॉ.राहुल भोईटे, नीलेश बेंडाळे, प्रशांत पाटील, संजय पाटील, डॉ.सारंग पाटील, सौरभ महाजन, पीयूष महाजन, स्वाती वानखेडे, ज्योती वानखेडे, पुष्कर भोईटे, रेणू भोईटे, देवांग देशपांडे यांच्यासह वेगवेगळे पक्षी अभ्यासक, पक्षीतज्ज्ञ अभ्यासक उपस्थित होते.





 

Web Title: The 120 species recorded in the Hatanaur Dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.