मक्यावर फवारणी करताना १२ महिलांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 06:23 AM2019-07-21T06:23:45+5:302019-07-21T06:24:12+5:30

जळगावनजीक वावडदा येथील महिला शेतामध्ये कामासाठी गेल्या होत्या. तेथे मक्याच्या पिकावर फवारणी करीत असताना महिलांचे हात पिवळे पडले व त्यांना चक्कर येऊ लागले.

12 women poisoning while spraying on maize | मक्यावर फवारणी करताना १२ महिलांना विषबाधा

मक्यावर फवारणी करताना १२ महिलांना विषबाधा

Next

जळगाव : शेतामध्ये मक्याच्या पिकावर फवारणी करीत असताना १२ महिलांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी वावडदा येथे घडली. या महिलांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

जळगावनजीक वावडदा येथील महिला शेतामध्ये कामासाठी गेल्या होत्या. तेथे मक्याच्या पिकावर फवारणी करीत असताना महिलांचे हात पिवळे पडले व त्यांना चक्कर येऊ लागले. संध्याकाळी शेतातून या महिला घरी आल्यानंतर चक्कर अधिकच वाढले व काही वेळातच त्यांना उलट्याही झाल्या. त्रास अधिकच वाढू लागल्याने या महिलांंना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. येथे येईप़र्यंत त्यांची प्रकृती अधिकच ढासळली व रुग्णालयातदेखील त्यांना उलट्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास झाला. 

महिलांची स्थिती पाहून नातेवाईक व परिसरातील नागरिक अधिकच भयभीत झाले. तातडीचे उपचार सुरू झाल्यानंतर उलट्यांचे प्रमाण कमी झाले, मात्र चक्कर येणे सुरूच होते. रात्रीपर्यंत हा त्रास सुरूच होता. 

दोन महिला ऑक्सिजनवर
यातील दोन महिलांना ऑक्सिजन लावण्यात आले असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 12 women poisoning while spraying on maize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव