११ संचालकांचा आता लोकसहकार गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:07 PM2019-06-17T13:07:29+5:302019-06-17T13:09:28+5:30

ग.स. सोसायटी: बेनामी संपत्तीचे आरोप बिनबुडाचे

 11 Directors of Lok Sahakar Group | ११ संचालकांचा आता लोकसहकार गट

११ संचालकांचा आता लोकसहकार गट

googlenewsNext

जळगाव : ग.स.सोसायटीत सन २०१२ ते २०१७ या कालावधीत बनावट खाते उघडून ३ ते ४ कोटीची बेनामी संपत्ती ठेवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या कालावधीचे लेखा परीक्षण अहवालात कुठलाही आक्षेप नोंदविलेला नाही, त्यामुळे विरोधकांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ग.स.तील सहकार गटातून बाहेर पडलेल्या ११ संचालकांनी आता लोकसहकार गटाची स्थापना केली असल्याचे त्यांनी सांगितले़
यावेळी उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, गटनेते तुकाराम बोरोले, संचालक विलास नेरकर, नथ्थू पाटील, सुनील निंबा पाटील, सुनील अमृत पाटील, अनिल गायकवाड, विश्वास सूर्यवंशी, यशवंत सपकाळे, सुभाष जाधव, संजय पाटील, दिलीप चांगरे आदींची उपस्थिती होती़
रविवारी दुपारी ग़स़ सोसायटीच्या सभागृहात पत्रकार परिषद झाली़ त्यावेळी ते बोलत होते़ ५० लाख रुपये किरण भीमराव पाटील यांच्या नावाने ठेव सोसायटीत ठेवण्यात आली होती. त्याबाबत संस्थेने चौकशी करुन संबंधितांवर कारवाई केलेली आहे. याबाबत सहकार खात्याने चौकशी करुन अहवाल संबंधितांना दिलेला असल्याचेही अध्यक्षांनी सांगितले. त्याचप्रमाणे हा व्यवहार नोटाबंदी पूर्वीच्या कालखंडातील असल्याचे सांगून विरोधकांनी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे व उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन संस्थेची, संचालक मंडळ व सभासदांची मानहानी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही पाटील म्हणाले. दरम्यान अमळनेर येथील इमारत विक्रीबाबत सर्व रितसर प्रक्रिया परवानगी घेऊन विहीत पध्दतीने टेंडर प्रक्रिया राबवून विक्री केलेली असून विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचेही संचालकांनी सांगितले. लोकसहकार गटाची स्थापना केली असल्याचेही पाटील यांनी सांगितले़
सभासदांसाठी विशेष नियोजन
संस्थेचे सभासद वाढविणे, कर्जाची मर्र्यादा वाढविणे, सर्व शाखा संगणकीकृत करणे, अपंग सभासदासाठी विशेष योजना सुरु करण्याचे नियोजन आहे. त्याच प्रमाणे डीसीपीएस धारकांकरीता एक लाख रुपए माफ करण्याची योजना असल्याचेही विलास नेरकर यांनी सांगितले.

Web Title:  11 Directors of Lok Sahakar Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.