बीड जिल्ह्यातील तरुणाला शहागड येथे जिवंत जाळले; आर्थिक व्यवहारात घातपात झाल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:24 PM2018-01-08T12:24:25+5:302018-01-08T12:45:44+5:30

बीड जिल्ह्य़ातील सामनापुर येथील तरुणाचे तारेने हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्या दरम्यान शहागड पासून जवळ असलेल्या पाथरवाला रस्त्यावर कुरण फाट्यावर घडली. अनंत श्रीकांत इंगोले  (27, रा. सामनापुर. ता. जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

A young man of Beed district burnt alive at Shahdad; Suspicion of a financial transaction | बीड जिल्ह्यातील तरुणाला शहागड येथे जिवंत जाळले; आर्थिक व्यवहारात घातपात झाल्याचा संशय

बीड जिल्ह्यातील तरुणाला शहागड येथे जिवंत जाळले; आर्थिक व्यवहारात घातपात झाल्याचा संशय

googlenewsNext
ठळक मुद्देअनंत श्रीकांत इंगोले  (27, रा. सामनापुर. ता. जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे.अनंत हा वासनवाडी  (ता.जि. बीड) च्या ग्रामपंचायत कार्यालयात ऑपरेटर म्हणून काम करत असे.

शहागड ( जालना ) : बीड जिल्ह्य़ातील सामनापुर येथील तरुणाचे तारेने हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्या दरम्यान  शहागड पासून जवळ असलेल्या पाथरवाला रस्त्यावर कुरण फाट्यावर घडली. अनंत श्रीकांत इंगोले  (27, रा. सामनापुर. ता. जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

अनंत हा वासनवाडी  (ता.जि. बीड) च्या ग्रामपंचायत कार्यालयात ऑपरेटर म्हणून काम करत असे. तसेच खाजगीत तो पॅन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड आदी तो काढून देण्याचे काम करायचा.  काही दिवसांपूर्वी त्याने पार्टनरशिप मध्ये हायवा ट्रक घेतला होता, आणि तो मुंबईत चालवण्यासाठी दिला होता. यासोबतच त्याने बँकींग ची परिक्षा देण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादला खासगी क्लाॅस लावला होता. यासाठी तो औरंगाबाद येथेच भाड्याच्या घरात राहत होता.

मध्यरात्री घडली घटना 
शहागड जवळील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना च्या वाॅचमनने गोंदी पोलिसांना मध्यरात्री १.३० च्या दरम्यान एक मृतदेह येथील रस्तावर जळत असल्याची माहिती दिली. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. यावेळी मृतदेह जळत होता, तो विझवण्याचा पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, उपनिरीक्षक विकास कोकाटे, सहाय्यक फौजदार सय्यद नासेर यांच्या सहकार्याने प्रयत्न केले मात्र ते व्यर्थ ठरले.तसेच मृताचे हात पाय तारेने बांधलेले होते अशी माहिती सोनुने यांनी दिली. मृतदेहाजवळ अर्धवट जळालेले पाॅकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, एटीएम कार्ड, काही पैसे व अन्य कागदपत्रे आढळून आले.  

घातपात बाबत दिली होती मित्राला कल्पना
रविवारी औरंगाबादहून बीडकडे येत असताना रात्री १२ वाजेच्या दरम्यान मित्र नवनाथ चव्हाण याने त्याला काॅल केला होता. तेव्हा आम्ही पाचोड जवळच्या ढाब्यावर जेवत आहोत, आणि माझ्या जिवाला धोका आहे, असे म्हटल्यााचे नवनाथ याने सांगितले.

भावास रात्री १२.४५ ला केला एसएमएस
अनंत ने घटना घडण्यापूर्वी पुणे येथे इंजिनिअर असलेल्या गोविंद इंगोले ला मोठ्या भावास एसएमएस केला होता. यात धुमाळ व अन्य एक माझ्या सोबत आहेत, आणि 21 लाख रुपये मला येणे आहे, असे एसएमएस मध्ये नमूद केले होते.

 

Web Title: A young man of Beed district burnt alive at Shahdad; Suspicion of a financial transaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalanaजालना