Young girl kidnapped; FIR against 2 | लग्नाचे आमिष दाखवून युवतीस पळविले

लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : लग्नाचे आमिष दाखवून एका अठरा वर्षीय युवतीस पळवून नेल्याची घटना तपोवन तांडा (ता.भोकरदन) येथे घडली. याप्रकरणी राजूर पोलीस चौकीत गुरुवारी दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवतीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, तपोवन तांडा येथे मुलगी घरात झोपलेली होती. मध्यरात्री उठून पाहिल्यानंतर ती घरात आढळून आली नाही. गावातील संशयित बंडू गोवर्धन चव्हाण याच्या आई-वडिलांकडे युवतीचा शोध घेण्यासाठी गेलो असता, बंडू सुध्दा बेपत्ता असल्याचे लक्षात आले. त्यानेच आपल्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले असून, त्याला त्याला गावातील विजय चव्हाण याने मदत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानुसार वरील दोघांवर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Web Title: Young girl kidnapped; FIR against 2
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.