नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 06:38 PM2019-05-02T18:38:15+5:302019-05-02T18:40:03+5:30

स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन

Young farmer suicides in Anbad taluka | नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Next

शहागड (जालना ) : अंबड तालुक्यातील बळेगाव येथील अल्पभूधारक तरूण शेतकरी कैलास लिंबा कुऱ्हाडे (२७) याने सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. १) रात्री नऊ वाजता उघडकीस आली. 

कैलास यांनी स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. याबद्दल परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या यांच्या पश्चात आई- वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. कैलास यांच्या कुटूंबास शासनाची मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू असे उपसभापती किशोर नरवडे यांनी सांगितले.

Web Title: Young farmer suicides in Anbad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.