सर्वांच्या सहकार्याने फेस्टिव्हलची परंपरा कायम ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:12 AM2018-09-25T01:12:37+5:302018-09-25T01:13:44+5:30

जालना फेस्टिव्हल सर्वांच्या सहकार्याने सुरुच राहील, अशी ग्वाही राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.

Will maintain the tradition of the festival with the help of everyone | सर्वांच्या सहकार्याने फेस्टिव्हलची परंपरा कायम ठेवणार

सर्वांच्या सहकार्याने फेस्टिव्हलची परंपरा कायम ठेवणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना गणेश फेस्टिव्हलची उंची दिवसेंदिवस वाढतच आहे. समाजिक प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचा ठेवा जतन करण्याचे काम या फेस्टिव्हलमधून होत आणि यापुढे देखील हा फेस्टिव्हल सर्वांच्या सहकार्याने सुरुच राहील, अशी ग्वाहीही राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली.
गेली आठ दिवस दररोज विविध विषयांंवरील कार्यक्रमातून प्रबोधन करणाºया जालना गणेश फेस्टिव्हलचा लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या कार्यक्रमाने समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या मध्यंतरात फेस्टिव्हलला विशेष सहकार्य करणा-यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल, सुरेशकुमार जेथलिया, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत या फेस्टिव्हलसाठी रात्रं दिवस काम करणा-या कार्यकर्त्यांचा गौरव आपल्या भाषणातून केला. याप्रसंगी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि त्यांच्या सहकलावंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. श्री गणपती वंदना करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सुरेखा पुणेकर यांच्यासह त्यांच्या चमूतील सहकलावंतांनी पारंपरिक तसेच नव्या ढंगातील लावण्यांसह जुन्या- नव्या चित्रपटांतील हिंदी- मराठी गीतांवर नृत्य करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय लाखे पाटील यांनी केले.

Web Title: Will maintain the tradition of the festival with the help of everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.