जालन्यात घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत भाज्यांचे दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:36 AM2018-10-23T11:36:16+5:302018-10-23T11:36:57+5:30

फळे,भाजीपाला : सध्या बाजारपेठेत जवळपास सर्वच प्रकारच्या भाज्यांची मुबलकता आहे़

 Vegetable prices are stable in wholesale and retail markets in Jalna | जालन्यात घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत भाज्यांचे दर स्थिर

जालन्यात घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत भाज्यांचे दर स्थिर

Next

जालना येथील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत भाज्यांचे भाव स्थिर आहेत़ विशेष करून फुलकोबी, पत्ताकोबी, भेंडी, बटाटे या भाज्यांना मोठी मागणी आहे़ सध्या बाजारपेठेत कोथिंबीर १४० रुपये शेकडा, टोमॅटो ७० ते १७० रुपये कॅरेट, शिमला मिरची १२० ते १५० रुपये प्रति दहा किलो, फुलकोबी १५ रुपये किलो, पत्ताकोबी १५० रुपयांची दहा किलो, हिरवी मिरची २५ रुपये किलो, भेंडीचे भाव वाढले असून, ३० रुपये किलोने विक्री होत आहे़

अदक्र, लसूण, कांदा आदींचे भाव स्थिर आहेत़ बटाटे १५ ते १६ रुपये किलोने विक्री होत आहेत़ हे भाज्यांचे भाव घाऊक बाजारपेठेतील असून, किरकोळ बाजारपेठेत वाहतुकीचा खर्च वाढत असल्याने या सर्व भाज्यांच्या किमतीत साधारणपणे ५ ते १० रुपयांचा फरक पडत आहे़ सध्या बाजारपेठेत जवळपास सर्वच प्रकारच्या भाज्यांची मुबलकता आहे़

Web Title:  Vegetable prices are stable in wholesale and retail markets in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.