कॉंग्रेसकडून मुस्लिमांचा वापर मतांसाठीच- हुसैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:54 AM2019-04-16T00:54:55+5:302019-04-16T00:55:34+5:30

कॉंग्रेस पक्षाने केवळ व्होटबँक म्हणून मुस्लिमांचा वापर केला असे मत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते व माजी मंत्री शाहनवाज हुसैन यांनी मांडले.

The use of Muslims by Congress only - Hussein | कॉंग्रेसकडून मुस्लिमांचा वापर मतांसाठीच- हुसैन

कॉंग्रेसकडून मुस्लिमांचा वापर मतांसाठीच- हुसैन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : कॉंग्रेस पक्षाने केवळ व्होटबँक म्हणून मुस्लिमांचा वापर केला परंतू मुस्लिमांच्या विकासासाठी काहीच केले नाही. यासाठी आता मुस्लिमांनी या पक्षाच्या भूलथापांना बळी न भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे उभे राहावे, असे मत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते व माजी मंत्री शाहनवाज हुसैन यांनी मांडले.
ते सोमवारी टेंभुर्णी येथे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित करीत होते.
पुढे बोलताना हुसैन म्हणाले की नरेंद्र मोदींच्या रुपात या देशाला एक सर्वोत्कृष्ट पंतप्रधान मिळाला आहे. त्यांच्या माध्यमातून या देशात विकासाची गंगा वाहत आहे. त्यांचा चाहतावर्ग अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प पेक्षाही अधिक आहे. चोरांच्या हातात देश देण्यापेक्षा चौकीदाराच्या हातात देणे कधीही चांगले असेही ते म्हणाले. खरे राष्टÑभक्त मुस्लिमच भारतात राहिले आहे. बाकी सर्व पाकिस्तानात निघून गेले. या देशाच्या जडणघडणीत मुस्लीमांचा मोठा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले. मतदारसंघाचा खा. रावसाहेब दानवे यांनी भरीव विकास केल्याचे ते म्हणाले. यावेळी आ. संतोष दानवे आदींची उपस्थिती होती.

Web Title: The use of Muslims by Congress only - Hussein

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.