दुष्काळात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी- उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:32 AM2019-01-10T00:32:41+5:302019-01-10T00:33:01+5:30

दुष्काळात शिवसेना शेतकºयांना वा-यावर सोडणार नाही. शेतक-यांच्या खांद्याला, खांदा लावून शेतक-यांना मदत करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बदनापूर येथे आयोजीत शेतकरी मेळाव्यात केले.

Uddhav Thackeray's support for farmers during the famine | दुष्काळात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी- उद्धव ठाकरे

दुष्काळात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी- उद्धव ठाकरे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : दुष्काळात शिवसेना शेतकºयांना वा-यावर सोडणार नाही. शेतक-यांच्या खांद्याला, खांदा लावून शेतक-यांना मदत करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बदनापूर येथे आयोजीत शेतकरी मेळाव्यात केले.
येथील चाणक्य मंगल कार्यालयात शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शेतक-यांना जनावरांसाठी पशुखाद्य वाटप करण्यात आले़यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, यापूर्वीच्या दुष्काळातही शेतक-यांना मदत व्हावी याकरीता आंदोलन करणारी शिवसेनाच होती. राज्याच्या ताकदीसमोर केंद्रशासनाला झुकावे लागले. शेतक-यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. शेतक-यांना माफी कशी करता त्यांना कर्जमुक्त करा, असा टोला ठाकरे यांनी केंद्र सरकारला लावला. मी आज राजकारण करायला आलो नाही. जनावरांना चारा नाही, पाण्यावाचून गुरे तडफडताहेत जनावरांना चारापाणी कोण देणार? राज्यात शेतक-यांना कर्जमाफी मिळेना, मात्र कर्जमाफीचे प्रमाणपत्र वाटण्यातच ३२ हजार कोटी कर्जमाफीचे गेले. मात्र याचा हिशोब सरकार देत नाही. प्रधानमंत्री पिकविमा, प्रधानमंत्री फळबाग अशा विविध योजना अंतर्गत शेतकºयांनी कोट्यवधी रुपये शासनाकडे भरले. मात्र शेतक-यांना तुटपुंजा विमा मंजूर करण्यात आला आहे. तर बहुतांश शेतक-यांना विमाच मिळाला नसल्याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. याला केंद्र आणि राज्य शासन जबाबदार असल्याचे ठाकरे यांनी टोला लावला. यावेळी माजी आमदार संतोष सांबरे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भगवी शाल देऊन स्वागत केले. यावेळी जि.प अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, जयप्रकाश चव्हाण, जि.प. सदस्य कैलास चव्हाण, गणेश डोळस, भगवान कदम, राजेंद्र ज-हाड राजेश जºहाड, गोरख लांबे, विलास पवार, भरत मदन, संजय बळप, अंबादास कोळसकर, मिर्झा शकूर बेग, नंदकिशोर दाभाडे, रवि बोचरे, श्रीराम कान्हेरे, अरूण डोळसे, राम पाटील आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
पंतप्रधान सोलापूरला आले मला अपेक्षा होती, ते दुष्काळासाठी काही मोठी घोषणा करून शेतक-यांना दिलासा देतील पण असे काही झाले नाही. यामुळे देशाचे पंतप्रधान शेतकºयांविषयी किती गंभीर आहेत, यावरुन दिसून येत असल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी यावेळी केली. यामुळे तुम्ही शिवसेना पक्षाच्या पाठीमागे उभे राहा, तुमच्या ताकदीवरच जे करता येईल, ते शिवसेना करेल असे यावेळी ठाकरे म्हणाले.यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.
पशुखाद्य वाटप
शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त शेतक-यांना पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. मराठवाड्यातील दुष्काळात शेतक-यांच्या जनावरांसाठी १०० ट्रक पशुखाद्य वाटप करण्यासाठी आणले आहेत. दुष्काळग्रस्त शेतक-यांना पाऊस पडेपर्यंत जास्तीत जास्त मदत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे करणार असल्याचे वचन दिले.

Web Title: Uddhav Thackeray's support for farmers during the famine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.