दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:44 AM2019-05-12T00:44:29+5:302019-05-12T00:44:40+5:30

भरधाव आयशरने दुचाकी स्वाराला चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

Two-wheeler crashed into the truck | दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले

दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भरधाव आयशरने दुचाकी स्वाराला चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान जालना रोडवर घडली.
या अपघातात प्रभाकर बंडू वाकेकर (वय ३५ रा. बरंजळा लोखंडे) हे जागीच ठार झाले. वाकेकर हे एमएच. २१.ए.एम. ३०३५. या दुचाकीवरून भोकरदनहून जालन्याकडे जात असताना विरूध्द दिशेने येणाऱ्या भरधाव वेगाने येणाºया आयशरने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.
या अपघातात वाकेकर हे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस येईपर्यंत आयशर चालक फरार झाला. दरम्यान शनिवारी आठवडी बाजारचा दीवस असल्याने बाजार आटोपून वाकेकर हे दुचाकीने जालना रोडने बरंजळा गावाकडे जात असताना हा अपघात झाला. वाकेकर यांच्या पश्चात तीन मुले, पत्नी, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे पोलिसांनी घटनेची नोंद केली घेतली आहे.

Web Title: Two-wheeler crashed into the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.