Two seriously injured in a truck-tempo accident in Jalna | जालन्यात ट्रक-टेम्पो अपघातात दोन गंभीर
जालन्यात ट्रक-टेम्पो अपघातात दोन गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सौदलगाव पाटीजवळ ट्रक व टेम्पोच्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान घडली.
औरंगाबादकडून बीडकडे जाणारा ट्रक (आरजे १४ जीएच १६७४) व बीडकडून औरंगाबादकडे जाणाºया टेम्पोची (एमएच २४ एयू ०६९४) समोरासमोर धडक झाली. यात टेम्पोमधील शेख हकीम खजमिया (२२) व सचिन जाधव (२३) हे गंभीर जखमी झाले.
दोघेही लातूरचे आहे. परिसरातील नागरिकांनी दोन्ही जखमींना औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघातील ट्रक चालकास गोंदी पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेचा तपास गोंदी येथील पोलीस जमादार भास्कर आहेर करीत आहे.


Web Title: Two seriously injured in a truck-tempo accident in Jalna
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.