अपघातात दोन अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 12:29am

उभ्या ट्रकला मोटारसायकल धडकून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क शहागड : उभ्या ट्रकला मोटारसायकल धडकून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. उसाने भरलेला ट्रक (एमएच-१२-क्यूए-९२०४) शहागडपासून काही अंतरावर औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उभा होता. रात्री नऊच्या रदरम्यान मोटारसायकल (एमएच-२३-के-९६) ने ट्रकला जोराची धडक दिली. यामध्ये मोटारसायकल चालकाचा चेहरा रक्तबंबाळ होऊन तो बेशुद्ध झाला. तर पाठीमागे बसणाराही गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच शहागड पोलीस चौकीचे उपनिरीक्षक विकास कोकाटे, सहायक फौजदार नासेर सय्यद, वाघमारे, विजय खरात आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारसायकलवरील इसमांनी मद्य प्राशन केलेले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. त्यांना तातडीने उपचारार्थ बीडला हलविण्यात आले. दरम्यान, ट्रक चालक सतीश हरिदास भोईटे (रा.सेलू, जि.बीड) हा ट्रक घेऊन फरार झाला.

संबंधित

ही तर 'भाऊबंध'की; उद्धव ठाकरेंची भूमिका राज ठाकरेंना आधीच कळते तेव्हा...
मित्राला फसविणाऱ्या लहू जाधवचा अनेकांना कोट्यावधीला गंडा
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला जाळले; पतीला जन्मठेप
औरंगाबादेत आजी-माजी पोलीस अधिकारी भिडले; कारला धक्का लागल्याचे ठरले कारण
औरंगाबादेत ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार 

जालना कडून आणखी

‘त्या’ युवकाची आत्महत्या की खून ?
बाहेरून येणारे दूध घटले..
२५० शिक्षकांना नोटिसा
भूसंपादन : अधिकाऱ्यांच्या वेतनातून नुकसान भरपाई
स्कूल बस, रिक्षातून विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्याचा निर्णय

आणखी वाचा