Two seriously injured in accident | अपघातात दोन अत्यवस्थ

लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : उभ्या ट्रकला मोटारसायकल धडकून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
उसाने भरलेला ट्रक (एमएच-१२-क्यूए-९२०४) शहागडपासून काही अंतरावर औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उभा होता. रात्री नऊच्या रदरम्यान मोटारसायकल (एमएच-२३-के-९६) ने ट्रकला जोराची धडक दिली. यामध्ये मोटारसायकल चालकाचा चेहरा रक्तबंबाळ होऊन तो बेशुद्ध झाला. तर पाठीमागे बसणाराही गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच शहागड पोलीस चौकीचे उपनिरीक्षक विकास कोकाटे, सहायक फौजदार नासेर सय्यद, वाघमारे, विजय खरात आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारसायकलवरील इसमांनी मद्य प्राशन केलेले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. त्यांना तातडीने उपचारार्थ बीडला हलविण्यात आले. दरम्यान, ट्रक चालक सतीश हरिदास भोईटे (रा.सेलू, जि.बीड) हा ट्रक घेऊन फरार झाला.