साडेपाच हजारांची लाच घेताना दोन जणांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:55 AM2019-05-23T00:55:51+5:302019-05-23T00:56:23+5:30

जालना नगर पालिकेतील आस्थापना विभागाचे कार्यालयीन अधीक्षक जोगस व अग्निशमन दलाचे अधिकारी गंगासागरे यांना ५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पकडले.

Two persons arrested for accepting a bribe | साडेपाच हजारांची लाच घेताना दोन जणांना पकडले

साडेपाच हजारांची लाच घेताना दोन जणांना पकडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना नगर पालिकेतील आस्थापना विभागाचे कार्यालयीन अधीक्षक जोगस व अग्निशमन दलाचे अधिकारी गंगासागरे यांना ५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पकडले. भाऊसाहेब सदाशिव जोगस (५२, ह.मु. सर्वे नं. ४१ मुकुंदनगर मारोती मंदिराजवळ, औरंगाबाद), सुरेश गंगाराम गंगासागरे (५७, ह.मु. फायर स्टेशन कॉलनी, जालना) अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार हे फायर सेप्टी अ‍ॅण्ड सर्व्हिसचे काम करतात. तक्रारदारांनी शहरातील हॉस्पिटल व हॉटेलचे अग्निशमन यंत्र बसवलेले आहे. या अग्निशमन यंत्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नाही. यासाठी नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असते. सदरचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी तक्रारदारांनी २१ मे रोजी अग्निशमन अधिकारी गंगासागरे यांची भेट घेऊन ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली. मात्र, अग्निशमन अधिकारी गंगासागरे यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
त्यानंतर तक्रारदारांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. सदर तक्रारीवरुन २१ मे रोजी अग्निशमन अधिकारी गंगासागरे व कार्यालयीन अधीक्षक जोगस यांची पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, दोन्ही आरोपींनी तडजोडीअंती ५५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. बुधवारी सापळा रचून अग्निशमक अधिकारी गंगासागरे यांच्या सांगण्यावरुन कार्यालयीन अधीक्षक जोगस यांनी पंचासमक्ष ५,५०० रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे एसीबी च्यावतीने सांगण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक रवींद्र निकाळजे, पो.नि. व्हि. एल. चव्हाण, पो.नि. काशिद, कर्मचारी धायडे, मनोहर खंडागळे, उत्तम देशमुख यांनी केली.

Web Title: Two persons arrested for accepting a bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.