Two people were killed in a car and a truck accident in Kedarkheda | केदारखेडा येथे कार व ट्रकच्या भीषण अपघातात दोन ठार

केदारखेडा ( जालना ) : राजुर रोडवरील बानेगाव पाटीवर आज सकाळी ६ वाजेच्या दरम्यान कार व ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात कारमधील  दोघे जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, नादेंड जिल्ह्यातील भोकर येथे जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथुन तिघे जन आज सकाळी कारने (एम.एच.२४ v.0407) जात होते. केदारखेडयाजवळ येताच जालान्याकडून येणारा  ट्रक (ए.पी. 16 वाय. 9939) यांची जोराची धडक झाली. यात कारमधील शैलेंद्र देवीदास गुजर (40, रा. शेंदुर्णी ता.जामनेर व समाधान दरबार पारधी (35, रा.एकलुती ता.जामणेर ) हे दोघे ठार जागीच ठार झाले. विलास ताराचंद पोष्टे ( रा. कळमसरा ) हे गंभीर जखमी झाले आहेत.