अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:55 AM2018-04-20T00:55:46+5:302018-04-20T00:55:46+5:30

भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. देऊळगावराजा-चिखली मार्गावरील दगडवाडी फाट्यावर गुुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.

Two killed in accident | अपघातात दोन ठार

अपघातात दोन ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. देऊळगावराजा-चिखली मार्गावरील दगडवाडी फाट्यावर गुुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.
आकाश ज्ञानेश्वर देशमुख (रा. दहेगाव, ता.जाफराबाद) शुभम राऊत (रा.औरंगाबाद) अशी मृतांची नावे आहेत. धनंजय रवींद्र वायाळ (रा.जालना) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर औरंगाबाद शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघेही जालना येथील मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
देऊळगावराजा पोलीस ठाण्याचे पोनि. एस. डी. नवलगावकर यांनी सांगितले, की अपघाग्रस्त तिघेहीे लग्नाच्या कार्यक्रमाहून दुचाकीवरून जालन्याकडे परत येत होते. देऊळगावराजा-चिखली दरम्यान दगडवाडी फाट्याजवळ चिखलीकडे जाणारी भरधाव कार व दुचाकीची धडक झाली. अपघातात दुचाकीवरील आकाश देशमुख व शुभम राऊत यांचा जागेवरच मृत्यू झाला. माहिती मिळताच देऊळगावराजा ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गंभीर जखमी धनंजय वायाळ यास जालना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यास औरंगाबाद शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री उशिरा मृतांचे नातेवाईक देऊळगावराजा येथे पोहोचले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: Two killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.