दोन वर्षात साडेसहा हजार शेततळी मंजूर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:06 AM2018-06-13T01:06:05+5:302018-06-13T01:06:05+5:30

राज्य सरकारने शेतक-यांसाठी मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. या योजनेला राज्यासह जालना जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे

Two hundred thousand farmers approved in two years ...! | दोन वर्षात साडेसहा हजार शेततळी मंजूर...!

दोन वर्षात साडेसहा हजार शेततळी मंजूर...!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्यातील सिंचनाचे श्रेत्र वाढावे तसेच शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळावे, या हेतूने राज्य सरकारने शेतक-यांसाठी मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. या योजनेला राज्यासह जालना जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन वर्षांत योजनेअतंर्गत जिल्ह्यात ६ हजार ४५० शेततळी तयार करण्यात आली.
गेल्या काही वर्षापासून पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू शेती पूर्णत : पावसावर अवलंबून आहे. याचा शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी राज्य सरकारने २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. जलसंधारणच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच सुरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देणे. हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. दरम्यान, सदरील योजनेतंर्गत पारदर्शकता यावी. म्हणून सरकारने इच्छुक शेतक-यांकडून आॅनलाईन अर्ज मागविले होते.
त्यानुसार जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. जिल्ह्यासाठी सरकारने कृषी विभागाला ६ हजार शेतळ््याचे उदीष्ट दिले होते. त्यानुसार मागील दोन वर्षांत ६ हजार ४५० शेततळे कृषी विभागाने शेतक-यांना वाटप केली. तसेच यातील ११८ शेतळ््याची कामे सुरू आहे.
यासाठी शासनाकडून २९ लाख १४ हजार ८६ रुपये खर्च करण्यात आले आहे. यात जालना तालुक्यात ११३७, बदनापूर ९८१, भोकरदन १८८६, जाफराबाद ४१५, परतूर ३४८, मंठा २६०, अंबड ९६५, घनसावंगी ५५९, अशी शेततळे तयार करण्यात आले आहेत.

Web Title: Two hundred thousand farmers approved in two years ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.