दोन गटांत तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 01:24 AM2019-05-16T01:24:54+5:302019-05-16T01:25:15+5:30

कठोरा बाजार येथे शेतातील लिंबाचे झाड तोडण्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत चार जण जखमी झाले

Two groups have a trumpet clash | दोन गटांत तुंबळ हाणामारी

दोन गटांत तुंबळ हाणामारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यातील कठोरा बाजार येथे शेतातील लिंबाचे झाड तोडण्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत चार जण जखमी झाले असून, परस्परविरोधी तक्रारीवरून २० जणांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत साबेरखाँ नाजिरखाँ पठाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांचा भाऊ अबीदखाँ पठाण याच्या गट २०४, २०१ मधील लिंब व गोधनचे झाड काही जणांनी तोडले. त्या कारणावरून १४ मे रोजी वाद झाला. त्यानंतर हा १५ मे रोजी त्यांनी शेतात ट्रॅक्टर का उभे केले, या कारणावरून वाद झाला. तो वाद गावातील नागरिकांनी मिटवला. मात्र, १५ मे रोजी भाऊ कालूखाँ नजीरखाँ पठाण हा चुलता अलिखाँ लाल पठाण यांच्या घराकडे चालला असताना अलीखाँ अजीजखाँ पठाण याने पोटात चाकू मारून जखमी केले. यावेळी त्यांच्या सोबत आलेल्या जावेदखाँ पठाण, इम्रानखाँ पठाण यांनी पकडून ठेवले व त्याच वेळी भांडण सोडविण्यासाठी त्यांची पत्नी बीबी कालुखाँ पठाण आली असता तिला अहमदखाँ पठाण व हरूनखाँ यांनी पकडून ठेवले व नसीबखाँ पठाण यांनी तिच्या करंगळीला चाकू मारून जखम केली त्यानंतर त्यांचे गावातील नातेवाईक गफ्फार पठाण, फारुखखाँ पठाण, जुबेरखाँ पठाण, नबीखाँ पठाण, हरूनखाँ पठाण, पाशुखा पठाण, आसिफखाँ पठाण, तौसिफखाँ पठाण, आद्दामखाँ पठाण (सर्व रा. कठोरा बाजार) यांच्या विरुध्द भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर जावेदखाँ पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून कालेखा पठाण, आंबेदखाँ पठाण, जाकीरखाँ पठाण, साबिरखाँ पठाण यांनी १४ मे रोजी त्यांची बहीण फातनाबी हिच्या शेतातील लिंबाचे झाड तोडण्याच्या कारणावरून मारहाण करून शिवीगाळ केली.
यावेळी हे सर्व घरासमोर आले तेव्हा त्यांना जाब विचारला असता साबेरखाँ नाजिरखाँ पठाण यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी नवाबखाँ पठाण, शहीनबी पठाण या भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांना या चार जणांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यावरून भोकरदन पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारीवरून २० जणां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू असून, याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून या दोन गटांमध्ये पूर्व वैमनस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. या हाणामारीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. परस्परविरोधी तक्रारी आल्याने दोन्ही बाजूंचे वास्तव जाणून घेऊन मगच कारवाई होईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक इमले यांनी दिली आहे.

Web Title: Two groups have a trumpet clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.