टेम्पोच्या अपघातात १२ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:37 AM2019-02-11T00:37:15+5:302019-02-11T00:37:39+5:30

व-हाडाला घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने १२ व-हाडी जखमी झाल्याची घटना ताडहातगाव ते भादली मार्गावर रविवारी सकाळी घडली.

Twelve passengers injured in a tempo accident | टेम्पोच्या अपघातात १२ प्रवासी जखमी

टेम्पोच्या अपघातात १२ प्रवासी जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी : व-हाडाला घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने १२ व-हाडी जखमी झाल्याची घटना ताडहातगाव ते भादली मार्गावर रविवारी सकाळी घडली.
अंबड तालुक्यातील ताडहातगाव येथील मुफ्ती शेख यांच्या लग्नाचे व-हाड टेम्पो (क्रमांक एम.एच. १ एच. ६३१०) ने भादली येथे सकाळी जात होते. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वळण रस्त्यावर चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला. व-हाडी रस्त्यावर फेकले गेल्याने सहा प्रवासी गंभीर तर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.
सकाळीची वेळ असल्याने मार्गावर फारशी वाहतूक नसल्याने मोठा अपघात टळला. नागरिकांच्या मदतीने जखमींना घनसावंगी येथील  रुग्णालयात दाखल करण्यात आले. हमजा शेख, फरहना शेख, अखीला शेख, महेबूब तांबोळी, अमीर शेख, रिहान शेख, अल्ताफ तांबोळी, रामदास काटकर, इस्माईल पठाण, शब्बीर शेख, शेख सलीम, इसाक शेख आदींचा जखमींमध्ये समावेश आहे.
दरम्यान, तालुक्यांतील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच वाहनधारक क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या दोन महिन्यांत अशा अपघाताच्या घटनात वाढ झाली आहे.
याकडे पोलिसांचेही दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Twelve passengers injured in a tempo accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.