विधिसेवा सल्ला केंद्राचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:54 AM2018-12-11T00:54:47+5:302018-12-11T00:55:13+5:30

दहा डिसेंबर हा मानवी हक्क दिवस असून, न्यायापासून कोणी वंचित राहू नये म्हणून, आजपासून गरीबासाठी हे विधिसेवा प्राधिकरणा मार्फत विधिसेवा केंद्र सुरु करण्यात आले, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश विरेश्वर यांनी दिली

Take advantage of the Legal Services Advice Center | विधिसेवा सल्ला केंद्राचा लाभ घ्यावा

विधिसेवा सल्ला केंद्राचा लाभ घ्यावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दहा डिसेंबर हा मानवी हक्क दिवस असून, न्यायापासून कोणी वंचित राहू नये म्हणून, आजपासून गरीबासाठी हे विधिसेवा प्राधिकरणा मार्फत विधिसेवा केंद्र सुरु करण्यात आले, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश विरेश्वर यांनी दिली.
या सल्ला (देखरेख) केंद्राचा गरिबांबरोबरच सर्वांनी लाभ घ्यावा असे अवाहनही त्यांनी या वेळी केले. जिल्हा विधिसेवा प्राधिकरण, आणि अल अजमत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जुना जालना भागातील मुजाहेद चौक येथे कायदे विषयक ग्राम देखरेख केंद्राचे उद्घाटन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एन. व्ही. विरेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधिसेवा प्राधिकरण विभागाचे अधीक्षक खुर्साले, अ‍ॅड. जे. एस. भुतेकर, सुनील सोनी, अ‍ॅड. कल्पना त्रिभुवन, माजी नगरसेवक अय्युब खान हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांचे अ‍ॅड. अर्शद बागवान यांनी स्वागत केले.
कार्यक्रमात पुढे बोलताना विरेश्वर म्हणाले की, १० डिसेंबर हा मानव दिवस म्हणून साजरा केला जातो, आणि याच दिवसापासून गरिबांना मार्गदर्शन करण्यासाठी विधि सेवा प्राधिकरण हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. गोरगरिबांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अ‍ॅड. कल्पना त्रिभुवन यांनीही विचार मांडले. यावेळी उस्मान मोमीन, शेख मुसा, सय्यद करीम, जावेद तांबोली, बडे खान, मजहर खान, बजरंग कांबळे, अमजद बागवान, सोहेल खान, अन्वर बागवान आदींची उपसिथती होती. या केंद्रातून गरिबांना मोफत विधिसल्ला मिळू शकतो. त्याचा लाभ घेण्याची गरज आहे.

Web Title: Take advantage of the Legal Services Advice Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.