जर्मन डॉक्टरांकडून ४४ जणांवर शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:38 AM2019-02-21T00:38:46+5:302019-02-21T00:39:16+5:30

जर्मनीतून तज्ज्ञ डॉक्टर हे त्यांची सुटी असताना जालन्यात येऊन गोरगरीब रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करतात. त्यांच्या या रूग्णसेवेला आता २० वर्षे झाली आहेत.

Surgery on 44 by German doctors | जर्मन डॉक्टरांकडून ४४ जणांवर शस्त्रक्रिया

जर्मन डॉक्टरांकडून ४४ जणांवर शस्त्रक्रिया

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जर्मनीतून तज्ज्ञ डॉक्टर हे त्यांची सुटी असताना जालन्यात येऊन गोरगरीब रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करतात. त्यांच्या या रूग्णसेवेला आता २० वर्षे झाली आहेत. यंदा या शिबिराचा प्रारंभ तीन दिवसांपूर्वी मिशन हॉस्पिटलमध्ये करण्यात आला. रोटरी क्लबच्यावतीने फाटलेली टाळू, तुटलेले ओठ, तसेच जळालेली त्वचा इ. आजारांवर हे तज्ज्ञ डॉक्टर शस्त्र क्रिया करतात. तीन दिवसांमध्ये जवळपास ४४ पेक्षा अधिक रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी उद्योजक राजेंद्र बारवाले, रोटरी क्लबचे अध्यक्ष विनोद लाहोटी, सचिव अनिल कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख अभय नानावटी, प्रसाद राव, प्रमोद झांझरी, शिवरतन मुंदडा, सुनील रायठठ्ठा, डॉ. सी.डी. मोजेस, शिवपाल शर्मा यांच्यासह सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. या शस्त्रक्रिया करताना जर्मन डॉक्टर यासाठीच्या सर्व औषधही मोफत देत आहेत. ११० रूग्णांची नोंदणी आहे.

Web Title: Surgery on 44 by German doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.