घनसावंगी तालुक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 07:29 PM2018-12-17T19:29:27+5:302018-12-17T19:32:28+5:30

सततची नापिकी व महाराष्ट्र बँकेचे असलेले कर्ज परतफेड करू शकत नसल्याने नैराश्यात होते.

Suicides of young farmer in Ghansavangi taluka | घनसावंगी तालुक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

घनसावंगी तालुक्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Next

राणीउंचेगाव (जालना ) : दुष्काळ व सततच्या नापिकीला कटांळून घनसावंगी तालुक्यातील शिंदी वडगाव  येथील ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातील  झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली.

विलास आसाराम चव्हाण (३२) असे शेतकऱ्याचे नाव आहे. चव्हाण हे सततची नापिकी व महाराष्ट्र बँकेचे असलेले कर्ज परतफेड करू शकत नसल्याने नैराश्यात होते. यामुळे कंटाळून पानेवाडी शिवारामधील गट क्रमांक ३२० मधील स्वत:च्या शेतात झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुले, एक भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Suicides of young farmer in Ghansavangi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.