न.प.च्या स्वच्छता निरीक्षकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:49 AM2019-02-02T00:49:26+5:302019-02-02T00:50:10+5:30

जालना : शहरातील शिवाजी पुतळा परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी ...

Suicide Inspector Killed NP | न.प.च्या स्वच्छता निरीक्षकास मारहाण

न.प.च्या स्वच्छता निरीक्षकास मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देजालना : कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

जालना : शहरातील शिवाजी पुतळा परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी संशयिताविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ नगरपालिका कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन केले.
जालना नगरपालिकेने सकाळी शिवाजी पुतळा चौकात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. स्थानिक अतिक्रमण धारकांनी या मोहिमेस विरोध केला. पालिकेच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात या परिसरातील काही टपºया हटविल्या. दरम्यान, मुर्तीवेस परिसरात संशयित बाला गोमतीलवाले व अन्य दोघांनी टपरी हटविल्याच्या कारणावरून स्वच्छता निरीक्षक संजय रमेशचंद्र खर्डेकर (५१) यांना शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता खर्र्डेकर यांना जबर मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
या घटनेनंतर नगरपालिकेच्या कर्मचाºयांनी पालिकेसमोर ठिय्या मांडून काम बंद आंदोलन केले. नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन मारहाण करणाºया संशयितांवर कारवाई करून अटक करण्याची मागणी केली. अन्यथा बेमूदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला. निवेदनावर संघटनेचे राजाराम गायकवाड, धर्मा खिल्लारे, केशव कानपुडे आदींच्या स्वाक्षºया आहेत. या प्रकरणी स्वच्छता निरीक्षक खर्डेकर यांनी दिलेल्या फियार्दीवरून संशयित बाला गोमतिवाले विरुध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Suicide Inspector Killed NP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.