बोंडअळीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:39 AM2018-06-20T00:39:07+5:302018-06-20T11:27:34+5:30

गेल्या वर्षी शेंदरी बोंडअळीचे नुकसान झालेल्या जालना तालुक्यातील ४६ गावातील १५ हजार ५४८ शेतक-यांच्या बँक खात्यात गुरुवारी ८ कोटी ३२ लाख रूपये वर्ग करण्यात आले आहे.

Subsidy deposited In farmers' account | बोंडअळीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात

बोंडअळीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या वर्षी शेंदरी बोंडअळीचे नुकसान झालेल्या जालना तालुक्यातील ४६ गावातील १५ हजार ५४८ शेतक-यांच्या बँक खात्यात गुरुवारी ८ कोटी ३२ लाख रूपये वर्ग करण्यात आले आहे. ऐन खरिपात नुकसानीचे अनुदान मिळाल्याने शेतक-यांतून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने कपाशीसह, सोयाबीन, तूर इ. पिके चांगली बहरली होती. पिके बहरल्याने उत्पन्नातही भर पडेल अशी आशा शेतक-यांना होती. मात्र जोमात असलेल्या कपाशी पिकावर अचानक शेंद्री बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पडला. वरुन हिरवीगार दिसणारे कपाशीचे बोंड आतून अळीने पोखरुन टाकले होते. यामुळे कापूस काढणीचा खर्च सुध्दा शेतक-यांना परवडेनासा झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. तालुक्यात सरासरी ६५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. तालुक्यात बोंडअळीने बाधित शेतक-यांच्या कपाशी पिकाची तहसीलच्या पथकाने पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. यामुळे तालुक्यातील ४६ गावातील १५ हजार ५४८ शेतकºयांना नुकसान भरपाईस पात्र ठरले. यासाठी शासनाने ८ कोटीचे अनुदान दिले होते. ते आता खात्यावर वर्ग झाले.

Web Title: Subsidy deposited In farmers' account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.