राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:03 AM2018-06-22T01:03:42+5:302018-06-22T01:03:42+5:30

अंबड तालुक्यातील ६५ गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ महावितरणच्या विरोधात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडीगोद्री येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Stop the path of NCP | राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको

राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील ६५ गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ महावितरणच्या विरोधात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडीगोद्री येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
तालुक्यातील अनेक गावामधील नागरिकांनी वीज बिल भरणा केलेला आहे. तसेच नागरिक नियमितपणे बिले भरत आहेत. त्या लोकांवर एक प्रकारे महावितरण कंपनीकडून अन्याय केला जात आहे. तालुक्यात शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना महावितरण कंपनीने कुठलीही पूर्व सूचना न देता २५ गावाचा विद्युत पुरवठा खंडित केला.तसेच ४० गावाचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश महावितरणने काढल्याने शेतक-यांत संताप व्यक्त होत आहे. शेतकरी आर्थिक संकटात असताना महावितरण कंपनी जुलमी पद्धतीने वागत असल्याचा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यानी केला.
अनेक शेतकरी कर्जर् बाजारीपणामुळे आत्महत्या करत असताना महावितरण कंपनीने शेतक-यांना वेठीस धरले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनामध्ये भाजपा सरकारबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.महावितरणकडे नागरिकांनी मीटर मिळण्याकरिता कोटेशन, नवीन मीटरची मागणी केली. परंतु त्या नागरिकांना पैसे भरूनही परवाना व मीटर देण्यात येत नाही. मागील पंधरवड्यात वादळ वा-याने पडलेले विद्युत खांब आजपर्यंत महावितरणकडून उभे करण्यात आले नाही.जमीनदोस्त झालेले खांब जशास तसे पहायला मिळत आहे. खांब पडून झालेले नुकसान व निर्माण झालेली वीज समस्या दूर करण्यासाठी कुठलीही योजना नाही. ग्राहकांना देण्यासाठी महावितरणकडे केबल, मीटर देखील नाहीत. महावितरणचे कर्मचारी हे रीडिंग घेण्यासाठी घरोघरी न जाता कुठेतरी एकाच ठिकाणी बसून अंदाजे रीडिंग टाकून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा पद्धतीने वीजबिल आकारले जाते. अशा एक ना अनेक समस्या असताना त्याकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार चालू आहे.तसेच महावितरण कंपनीने आपला मनमानी पणा थांबवून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी जि. प. उपाध्यक्ष सतीश टोपे, जिल्हा बँकेचे चेअरमन मनोज मरकड, जि.प.सदस्य विष्णूपंत गायकवाड, संजय पटेकर, भाऊसाहेब कनके, सदाशिव दुफाके, बापूराव खटके, किरण तारख, विकास कव्हळे, भागुजी मैंद, बाबासाहेब बोंबले, अशोक मांगदरे, राजन उढाण, सहदेव भारती, बाबासाहेब मस्के, सलीम शेख, बाबासाहेब गावडे,नारायण वायाळ, आदी सहभागी झाले होते.

Web Title: Stop the path of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.