राज्य उत्पादन शुल्क रिकाम्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:24 AM2018-06-29T01:24:00+5:302018-06-29T01:24:56+5:30

राज्य उत्पादन शुल्क आणि घनसावंगी पोलीसांच्या तीन पथकाने शिवणगाव, धामणगाव येथे अचानक धाडी टाकून एकावर कारवाई करण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. परंतु ठोस कारवाई न झाल्याने राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

Squad could not find illegal wine | राज्य उत्पादन शुल्क रिकाम्या हाती

राज्य उत्पादन शुल्क रिकाम्या हाती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : राज्य उत्पादन शुल्क आणि घनसावंगी पोलीसांच्या तीन पथकाने शिवणगाव, धामणगाव येथे अचानक धाडी टाकून एकावर कारवाई करण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. परंतु ठोस कारवाई न झाल्याने राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
घनसावंगी तालुक्यातील धामनगाव येथील महिलांनी गावातील अवैध दारु विक्रेत्यावर हल्लाबोल करत घरातील दारू रस्त्यावर आणून फोडल्याची घटना ताजी असतानाही या गावात एकावरही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. शिवणगावात एकावर कारवाई करत २६५० रुपये किंमतीची ५० लिटर हातभट्टी दारुच्या दोन कॅन जप्त करण्यात आल्या. एकूणच धामनगाव येथील कोणाच्या घरात घुसून दारूअड्डा उद्ध्वस्त केला याचाही अद्याप तपास लागलेला नसल्याने कारवाईबाबत शंका व्यक्त होत आहे.
यावेळी पथकाने गावात येताच बचत गटाच्या महिलांनी स्वत: जाऊन पथकास ठिकाणे दाखवून दारुचा साठा पकडून देण्यास मदत केली. या महिलांच्या मदतीमुळेच कारवाई शक्य झाली.

Web Title: Squad could not find illegal wine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.