शहागडला एक कोटीचा गुटखा पकडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 07:28 PM2017-11-13T19:28:28+5:302017-11-13T19:28:36+5:30

बीडहून जालन्याकडे जाणाऱ्या कंटेनरमधून पोलिसांनी सुमारे एक कोटी रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.

Shahadad got a one-gkka gutka | शहागडला एक कोटीचा गुटखा पकडला

शहागडला एक कोटीचा गुटखा पकडला

googlenewsNext

जालना : बीडहून जालन्याकडे जाणाऱ्या कंटेनरमधून पोलिसांनी सुमारे एक कोटी रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. शहागड -अंकुश नगर दरम्यान सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली. गुटख्याने भरलेला कंटेनर गोंदी पोलीस ठाणे परिसरात लावण्यात आला आहे.
याबाबत गोंदी ठाणे अंमलदार मोगरे व गाढवे यांच्याशी संपर्क साधला असता कंटेनरमध्ये एक कोटीच्या पुढेच गुटखा आहे.
अजून गुन्हा दाखल करण्यात आला नाही, याबाबत अन्न व औषध प्रशासनाला कळवले आहे. उद्या सकाळी अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून संयुक्त कारवाई करण्यात येईल, असे ठाणे अंमलदार मोगरे व गाढवेंनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Shahadad got a one-gkka gutka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.