सर्व्हरच्या विळख्यात सातबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:58 AM2019-05-29T00:58:51+5:302019-05-29T00:59:16+5:30

आॅनलाईन सात बारा निघत नसल्यामुळे शेतकरी सेतू -सुविधा तासन्तास तात्काळ राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांनीसंताप व्यक्त केला.

Satbaras hanged in server | सर्व्हरच्या विळख्यात सातबारा

सर्व्हरच्या विळख्यात सातबारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : गेल्या चार दिवसांपासून महाअभिलेखचा आॅनलाईन सातबारा उतारा मिळण्यास शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. आॅनलाईन सात बारा निघत नसल्यामुळे शेतकरी सेतू -सुविधा तासन्तास तात्काळ राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांनीसंताप व्यक्त केला.
प्रशासन गतीमान करण्यासाठी शासनाने पेपरलेस काम करण्याचा निर्णय घेतला यात शेतक-यांना आॅनलाईन सात बारा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, ही प्रणाली सुरळीत चालावी याकरीता आवश्यक ती उपाययोजना वेळीच घेतली जात नसल्यामुळे आॅनलाईन सातबाराचा बोजवारा उडाला आहे़ शेतकºयांना खरेदी विक्रीचे व्यवहार, विविध शासकीय कार्यालयातील अनुदानीत योजना, बँकेचे नवीन कर्ज,जुन्या कर्जाचे पुर्नगठण, विविध प्रमाणपत्रे अशा अनेक शासकीय कामांसाठी आॅनलाईन सातबाराची आवश्यकता असते़त्यासाठी शेतकरी महाईसेवा किंवा अन्य केंद्रांमध्ये जातात व आॅनलाईन सातबारासह अन्य आवश्यक असणारी कागदपत्रे काढतात मात्र आॅनलाईन निघणारे सातबाराचे उतारे गेल्या शनिवारपासून निघत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
शेतक-यांना सातबारा उतारा विविध शासकीय कार्यालयातील कामकाजासाठी उपयोगी पडतो. तालुका कृषि,भूमी अभिलेख, रजिस्ट्री, वनविभाग, अशी अनेक शासकीय कार्यालये आहेत तसेच शेजारीच न्यायालय,पंचायत समिती कार्यालय आहे़
ही सर्व शासकीय कार्यालये शहरापासून दोन ते तीन की. मी. अंतरावर आहेत़शेतक-याना यापैकी अनेक कार्यालयांमधे सातबारा उतारा द्यावा लागतो. यामुळे शेतक-यांना चकरा माराव्या लागत आहे. यामुळे तहसील कार्यालयात सातबारा मिळण्याची सुविधा करावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.
लवकरच मिळेल सातबारा
तांत्रिक अडचणीमुळे आॅनलाईन सातबार मिळण्यास शेतक-यांना अडचणी येत आहे. यावर युध्द पातळीवर काम करण्यात येत आहे. काही दिवसातच शेतकºयांना आॅनलाईन सातबारे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.अशी माहिती तहसीलदार छाया पवार यांनी सांगितले.

Web Title: Satbaras hanged in server

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.