वाळू तस्करी करणारे ४ हायवा पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:21 AM2018-10-18T00:21:28+5:302018-10-18T00:22:31+5:30

गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या ४ हायवावर गोंदी पोलीस व महसूल पथकाने संयुक्त कारवाई करून एकूण ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

Sand smugglers captured 4 highways | वाळू तस्करी करणारे ४ हायवा पकडले

वाळू तस्करी करणारे ४ हायवा पकडले

Next
ठळक मुद्देपोलीस, महसूलची कारवाई : ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
शहगड : गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या ४ हायवावर गोंदी पोलीस व महसूल पथकाने संयुक्त कारवाई करून एकूण ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
शहगड येथील नदी पात्रातून हायवा क्रंमाक (एमएच. २१. ए यु. ०४६१), (एमएच. २०. ईजी. १९२५), (एमएच. २१. एक्स. ३४९४), ( एमएच. २१. एबी. ६३२२), असे चार हायवा वाळू घेऊन औरंगाबादकडे जात असतांना वडीगोद्री येथे त्यांना पकडून त्यातील अवैध गौण खनिज वाळूसह ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी सात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून वाळू तस्करांविरुध्द पोलीस कारवाई करत असूनही वाळू तस्कर वाळू चोरी करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलीस ठाण्याचे पोनि. अनिल परजने, उपनिरीक्षक हनुमंत वारे, तलाठी कृष्णा मुजगूले, पोकॉ. महेश तोटे, बाबा डमाळे, अमर पोहार, सहाय्यक फौजदार सय्यद नासिर, ज्ञानेश्वर मराडे, विशाल काळे, शिवाजी डाखूरे, प्रदीप घोडके, ज्ञानेश्वर केदार आदींनी केली.

Web Title: Sand smugglers captured 4 highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.