लाल परी नव्या साजशृंगारात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:18 AM2019-01-21T00:18:47+5:302019-01-21T00:20:52+5:30

नव्या नवरी प्रमाणे नटलेली ही एक नवीन बस रविवारी जाफराबाद आगारात दाखल झाली आहे.

S T buses in a glorifying look | लाल परी नव्या साजशृंगारात !

लाल परी नव्या साजशृंगारात !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : ग्रामीण जनतेच्या प्रवासाची मुख्य मदार सांभाळणारी लालपरी आता वेगळ््या लुकमध्ये दिसली तर कोणाला नवल वाटायला नको. नवी नसली तरी नव्या नवरी प्रमाणे नटलेली ही एक नवीन बस रविवारी जाफराबाद आगारात दाखल झाली आहे.
जालना येथून जाफराबादला जाताना ही नवपरी जेव्हा टेंभुर्णी स्थानकावर आली तेव्हा सर्वच प्रवासी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागले. काहींनी तर ही आपली बस नसून खाजगी बसच आहे म्हणून तिच्यात बसायचेही टाळले होते. मात्र, तिच्यात बसचे वाहक- चालक दिसताच प्रवाशांनी तिच्याभोवती गराडा घातला.
वरील भाग पांढरा शुभ्र व खालून एक छोटा लालपट्टा या रूपात स्टील बॉडी घेऊन ही लाल परी नटली आहे. आगाराच्या ज्या बसेसची दुरवस्था झाली आहे. अशा बसेसचे नूतनीकरण सध्या एसटीच्या औरंगाबाद वर्कर्शापमध्ये केले जात आहे.
त्यानुसार जाफराबाद आगारातून दोन जुन्या बसेस नूतनीकरणासाठी पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका बसचे प्रवाशांच्या सेवेत आगमन झाले आहे.
या बसची उंचीही थोडी वाढविण्यात आली असून तिला एशियाड सारखा लुक देण्यात आला आहे. दरम्यान इंजिन जुने असले तरी नवे रूपडे घेऊन आलेली ही लालपरी सर्वांना हेवा वाटावा अशीच दिसत असल्याने प्रवासी मोठ्या आवडीने तिच्यात बसत आहेत.
सर्वच बस नवीन लुकमध्ये -निकम
यापुढे सर्वच बस याच नवीन लुकमध्ये बनविल्या जाणार असल्याची माहिती एसटी कामगार सेनेचे जाफराबाद आगार अध्यक्ष धनंजय निकम यांनी दिली आहे. दरम्यान लाल परीचे हे सुंदर रूपडे प्रवाशांना नक्कीच मोहिनी घालणार असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून येत आहेत.

Web Title: S T buses in a glorifying look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.