राजुरेश्वर संस्थान अव्वल तीर्थक्षेत्र बनवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:50 AM2018-03-19T00:50:38+5:302018-03-19T00:50:38+5:30

राजूरेश्वर संस्थानचा चौफेर विकास साधून आगामी काळात मराठवाडयात अव्वल दर्जाचे तीर्थक्षेत्र बनविणार असल्याची ग्वाही, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब यांनी दिली. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर राजूरेश्वराला सुवर्णजडित चांदीच्या सिंंहासनावर विराजमान करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

Rajureshwar trust will be the top pilgrimage place | राजुरेश्वर संस्थान अव्वल तीर्थक्षेत्र बनवणार

राजुरेश्वर संस्थान अव्वल तीर्थक्षेत्र बनवणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : राजूरेश्वर संस्थानचा चौफेर विकास साधून आगामी काळात मराठवाडयात अव्वल दर्जाचे तीर्थक्षेत्र बनविणार असल्याची ग्वाही, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब यांनी दिली. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर राजूरेश्वराला सुवर्णजडित चांदीच्या सिंंहासनावर विराजमान करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
रविवारी राजुरेश्वराच्या मंदिरात खा. रावसाहेब दानवे, निर्मला दानवे यांच्याहस्ते मंत्र्त्रोच्चाराच्या जयघोषात विधिवत महापूजा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, आ.संतोष दानवे, आ. नारायण कुचे, संस्थानच्या अध्यक्षा तहसीलदार योगिता कोल्हे, राजेश सरकटे, रेणू दानवे, शीतल कुचे, विश्वस्त साहेबराव भालेराव, शिवाजी पुंगळे, भास्कर दानवे, सखाराम काळे, कैलास पुंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खा.दानवे म्हणाले, राजुरेश्वराला सिंंहासन करण्याची भाविकांची अनेक दिवसांपासून इच्छा होती. त्यासाठी दात्यांच्या देणगीतून एक क्विंंटल चांदीचे सिंंहासन तयार करण्यात आले. राजूरेश्वर मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी दोन कोटी रूपये खर्चाच्या सभामंडपासाठी निधी मंजूर झाला आहे. तीर्थक्षेत्र परिसर विकास निधीतून २५ कोटी रूपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
या निधीचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी देण्यात आला आहे. उपस्थितांची समयोचित भाषणे झाली. सिंंहासन तयार करण्यासाठी योगदान देणाऱ्यांचा दानवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एस. एस. माळी यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रशांत दानवे यांनी आभार मानले.

Web Title: Rajureshwar trust will be the top pilgrimage place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.