आमदार आणि पोलिसांत जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:56 AM2018-06-12T00:56:12+5:302018-06-12T00:56:12+5:30

अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याच्या प्रकरणात आ.नारायण कुचे यांनी पोलीस निरीक्षकांशी मोबाईलवरून संपर्क साधला. यावेळी अर्वाच्य भाषेचा वापर आमदारांकडून करण्यात आरोप पोलिसांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Quarrel between MLA and police | आमदार आणि पोलिसांत जुंपली

आमदार आणि पोलिसांत जुंपली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : तालुक्यातील राहुवाडी येथील दोन युवकांना एका साखर कारखान्याच्या मुकादमाने पैशाच्या देवणा-घेवाणीतून अपरहण केल्याचा प्रकार घडला होता. त्या दोन युवकांपैकी एक युवक गावाकडे परतला. त्यावेळी त्यांच्यावरच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याच्या प्रकरणात आ.नारायण कुचे यांनी पोलीस निरीक्षकांशी मोबाईलवरून संपर्क साधला. यावेळी अर्वाच्य भाषेचा वापर आमदारांकडून करण्यात आरोप पोलिसांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
राहुवाडी येथील रहिवासी भीमराव राठोड यांच्या तक्रारी संदर्भात सोमवारी अंबडचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिरूध्द नांदेडकर यांना आ. नारायण कुचे यांनी मोबाईलवरून संपर्क केला. राठोड यांच्या प्रकरणात गुन्हे कसे दाखल करता अशी विचारणा आ. कुचे यांनी केली. त्यावर नांदेडकर यांनी अशी सूचना आपण दिली नसल्याचे सांगितले. तसेच मोबाईलवरून कॉन्फरन्स कॉलवर अंबड पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक ए.पी. अवसरे यांना जोडले. त्यावेळी पोलीस निरीक्षकांच्या सांगण्यावरून आपण गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अवसरे यांनी सांगितले. त्यावेळी आ. कुचे आणि नांदेडकर तसेच अवसरे यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादाची नोंद अवसरे यांनी थेट अंबड पोलीस ठाण्यात रोनामा रजिस्टरमध्ये घेतली. तसेच जो संवाद झाला त्याची कॅसेटही काढण्यात आल्याचे अवसरे यांनी सांगितले. एकूणच या पोलीस अधिकारी आणि आमदारांमधील झालेल्या संभाषणाची अंबड शहरात दिवसभर चर्चा होती.
नारायण कुचे : अपशब्द वापरले नाहीत
राहुवाडी येथील प्रकरणात पोलीस कर्मचारी अवसरे हे त्या गावात गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथे या प्रकरणात मी गुन्हा दाखल करण्यास सांगितले, अशी चुकीची माहिती दिली. त्याचा खुलासा करण्यासाठी आपण पोलीस निरीक्षक नांदेडकर तसेच अवसरे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करून विचारणा केली. त्या संभाषणा दरम्यान आपण कुठलेच अपशब्द पोलीसांबद्द वापरले नाहीत. मी पोलीसांशी काय बोललो याची रेकॉडींग माझ्याकडेही आहे.
कायदेशीर बाबी तपासणार
या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्याशी या प्रकरणी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, अद्याप माझ्यापर्यंत हे प्रकरण आलेले नाही. जर असे काही घडले असेल तर कायद्यात ज्या तरतुदी आहेत, त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ.
- लता फड, अप्पर पोलीस अधीक्षक, जालना

Web Title: Quarrel between MLA and police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.