बहुजन समाजबांधवांचा निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:13 AM2019-01-30T01:13:05+5:302019-01-30T01:13:40+5:30

जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे शेतीच्या वादावरून गरीब माळी समाजाच्या कुटुंबावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ मंगळवारी माळी समाज, अखिल बहुजन समाजबांधवाच्या वतीने शिवाजी चौकात एकत्र येत या घटनेचा निषेध केला.

Protest rally by Bahujan communities | बहुजन समाजबांधवांचा निषेध मोर्चा

बहुजन समाजबांधवांचा निषेध मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे शेतीच्या वादावरून गरीब माळी समाजाच्या कुटुंबावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ मंगळवारी माळी समाज, अखिल बहुजन समाजबांधवाच्या वतीने शिवाजी चौकात एकत्र येत या घटनेचा निषेध केला. कुटुंबियावर हल्ला करणाऱ्या गावगुंडाना अटक करण्याची मागणी केली.
या निषेध मोर्चात बहुसंख्य समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला निषेधाबाबत लेखी निवेदन या संतप्त जमावाने दिले. यावेळी रावसाहेब अंभोरे, विष्णू जमधडे, संजय राऊत, ज्ञानेश्वर उखर्डे, रवींद्र उखर्डे, तान्हाजी जमधडे, सुरेश गवळी, रामधन कळंबे, फैजल चाऊस, गजानन मुळे, किशोर कांबळे, पांडुरंग बोरसे आदींसह बहुजन समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती.
आरोपींना लवकरच अटक करू
या प्रकरणातील मुख्य आरोपी रावसाहेब भवर यास सोमवारी अटक करण्यात आली होती. मंगळवारी भवर यांना जालना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. या घटनेतील अन्य दहा आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलीस अधीकारी जायभाये म्हणाले.
जालना : जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे शेतीच्या वादातून भाजपा किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी साथीदारांच्या मदतीने एका शेतक-यासह तीन महिलांना जबर मारहाण केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी माळी समाजाबांधवांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या घटनेतील आरोपींना अटक करण्याची मागणी एसपी. एस. चैतन्य यांना निवेदनाव्दारे केली. यावेळी राष्ट्रवादीचे बबलू चौधरी, शिवसेनेचे भास्कर अंबेकर यांची उपस्थिती होती.
देशभर आंदोलन छेडणार - शंकरराव लिंगे
निवडुंगा येथील शेती वाद प्रकरणी गरीब खांडेभराड कुटुंबावर हल्ला करणा-या गुंड प्रवृत्तीच्या आरोपींना अटक करून कडक शासन करावे. अन्यथा याविरुद्ध देशभर आंदोलन छेडले जाईल. अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी केली आहे. ते मंगळवारी या प्रकरणी आढवा घेण्यासाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला आले असता लोकमतशी बोलत होते.

Web Title: Protest rally by Bahujan communities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.