सीड्स पार्कच्या अडचणींचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:37 AM2019-02-12T00:37:45+5:302019-02-12T00:38:05+5:30

बहुचर्चित सीडस् पार्कचे काम कोणत्या एजन्सीने करावे या मुद्यावरून तीन वर्षे वाया गेली आहेत. मात्र, आता राज्य सरकारने यात विशेष लक्ष घालून हे काम एमआयडीसीनेच करावे असे निश्चित केले आहे.

The problems of Seeds Park have been solved | सीड्स पार्कच्या अडचणींचा तिढा सुटला

सीड्स पार्कच्या अडचणींचा तिढा सुटला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बहुचर्चित सीडस् पार्कचे काम कोणत्या एजन्सीने करावे या मुद्यावरून तीन वर्षे वाया गेली आहेत. मात्र, आता राज्य सरकारने यात विशेष लक्ष घालून हे काम एमआयडीसीनेच करावे असे निश्चित केले आहे. सिडस् पार्कचा आराखडा तयार करण्यासाठी एका खाजगी एजंसीची मदत घेणार असल्याचे सांगण्यात आले.
जालना ही बियाणांची राजधानी असून, याला आणखी चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्येच जालन्यात शीतल सीडस्च्या कार्यक्रमात जाहीर केले होते. यासाठी कॅबिनेटने ११० कोटी रूपये मंजूरही केले आहेत. परंतु निधी उपलब्ध असतानाही केवळ शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे हा प्रकल्प कागदावरच राहीला. परंतु आता या प्रकल्पाने गती घेतली असून, जिल्हधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यात पुढाकार घेतला असून, याठी समन्वयक म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांची नियुक्ती केली आहे.
या सीडस् पार्कमध्ये अंदाजित तीन हजार कोटी रूपयांची गुंतणवूक अपेक्षित असून, त्यासाठी शंभर एकर जमीन ही जालना ते देऊळगावराजा मार्गवर संपादित केली आहे. या उपक्रमातून जालन्यात संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार असून, यातून शेतकऱ्यांचे माती परीक्षण तसेच बियाणांची गुणवत्ता त्तपासता येणार आहे. आता पर्यंत या बीजोत्पादन क्षेत्रात जवळपास २० हजार शेतकरी सहभागी असून, त्यांची वार्षिक उलाढाल ही २५० कोटी रूपयांच्या घरात आहे.
जालना जिल्ह्यातील पोषक वातावरण ही या प्रकल्पाची जमेची बाजू असून, त्याच मूळे येथे पूर्वीही बियाणे उद्योगाचा विकास झाला आहे. त्याच धर्तीवर हा सीडस् पार्क उभा राहिल्यास त्यातून जवळपास ४० हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळू शकेल असेही सांगण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी किमान एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. गुजरात आणि तेलंगणामध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: The problems of Seeds Park have been solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.