चोख पोलीस बंदोबस्तात मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:15 AM2019-04-24T01:15:57+5:302019-04-24T01:16:11+5:30

जालना लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही

Polling in the peaceful atmostphere | चोख पोलीस बंदोबस्तात मतदान

चोख पोलीस बंदोबस्तात मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्ह्यात मतदान प्र्रक्रिया शांततेत पार पडली. असून, दीड हजारावर पोलिसांचा दोन दिवस खडा पहारा होता.
मतदान शांततेत पार पडावे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहर पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर तसेच जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नियंत्रणात तालुक्यावरील पोलीस बंदोबस्ताची पाहणी करण्यात येत होती. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी प्रत्येक तालुक्यासह संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्राची माहिती घेऊन पाहणी केली होती.
संसाराची सुरुवात लोकशाहीच्या हक्काने !
भोकरदन विधानसभा मतदार संघातील देहेड येथील नवरदेव शिवाजी सुधाकर बावस्कर यांनी विवाहाला जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावून आधी लोकशाहीच्या कर्तव्याला प्राधान्य देऊन नंतर बोहल्यावर चढले.
प्रत्येक निवडणुकीत मतदानाचे कर्तव्य !
जालना येथील माळीपुरा भागातील गयाबाई आसाराम चव्हाण या १०६ वय असलेल्या वृद्ध मतदाराने आज सकाळी सरस्वती भुवन प्रशालेच्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. या त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा युवकांनी आदर्श घ्यावा.

Web Title: Polling in the peaceful atmostphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.