पीकविमा कंपन्यांनी हलगर्जीपणा करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:01 AM2019-06-18T01:01:27+5:302019-06-18T01:02:12+5:30

विमा कंपन्यांनी हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले.

Peugeit companies should not be indecisive | पीकविमा कंपन्यांनी हलगर्जीपणा करू नये

पीकविमा कंपन्यांनी हलगर्जीपणा करू नये

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पीक विमा कंपन्यांकडे विम्याचा हप्ता म्हणून कोट्यवधी रुपये भरले. परंतु त्या तुलनेत विमा कंपन्यांकडून पाहिजे त्या प्रमाणात नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आगामी विमा कंपन्यांनी हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले.
सोमवारी पीकविमा कंपन्या आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांची बैठक झाली. त्यात भोकरदन तालुक्यातील २६ हजार ४१२ शेतक-यांना ८.६० कोटी, जाफराबाद तालुक्यातील ४७२७ शेतकºयांना १.५५ कोटी, परतूर तालुक्यातील ९७८३ शेतक-यांना ३.८२ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला असून, बदनापूर, घनसावंगी, अंबड तालुक्यांमधील शेतक-यांना विमा वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. एकूणच यावेळी वायाळ यांनी प्रत्येक कंपनीने आपले कार्यालय जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थापन करून तेथील अधिका-यांचा मोबाईल क्रमांक शेतकºयांसाठी खुला करावा, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीत विमा कंपन्यांनी देखिल त्यांना येणा-या तांत्रिक अडचणींविषयी माहिती दिली. बैठकीस कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, विजय माईनकर आदींची उपस्थिती होती.
पीकविमा भरताना जिल्ह्यातील ई-सुविधा केंद्रावर शेतक-यांकडून सरासरी शंभर रुपये घेतले जात असल्याच्या तक्र ारी आहेत. यापुढे शेतकºयांनी ई-सेवा केंद्रावर कुठलेच पैसे द्यायचे नाहीत, असे निर्देशही आढावा बैठकीत सोहम वायाळ, कृषी अधीक्षक शिंदे यांनी दिले.

Web Title: Peugeit companies should not be indecisive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.